कुर्तीत गबाळ्या-लुकड्या दिसता, ‘या’ ७ प्रकारच्या कुर्ती घ्या- मिळेल सेलिब्रिटींसारखा परफेक्ट लूक-दिसाल आकर्षक...

Updated:January 7, 2026 18:27 IST2026-01-07T18:17:28+5:302026-01-07T18:27:04+5:30

kurti patterns that make slim girls look curvy : kurti design for skinny girls : trendy kurti pattern for thin girls : best kurti for skinny body shape : शरीराने खूपच बारीक असाल तर कोणत्या प्रकारच्या कुर्तीज घालाव्यात, कोणते पॅटर्न निवडावेत...

कुर्तीत गबाळ्या-लुकड्या दिसता, ‘या’ ७ प्रकारच्या कुर्ती घ्या- मिळेल सेलिब्रिटींसारखा परफेक्ट लूक-दिसाल आकर्षक...

आपल्यापैकी प्रत्येक मुलीची इच्छा असते की तिने घातलेले कपडे तिच्या (kurti patterns that make slim girls look curvy) व्यक्तिमत्त्वाला साजेसे असावेत. परंतु, ज्यांचे शरीर खूपच सडपातळ किंवा बारीक असते, त्यांना अनेकदा कपड्यांच्या फिटिंगची आणि लूकची चिंता वाटते. कधी कुर्ती खूप सैल वाटते, तर कधी अधिक बारीक दिसण्याची भीती वाटते.

कुर्तीत गबाळ्या-लुकड्या दिसता, ‘या’ ७ प्रकारच्या कुर्ती घ्या- मिळेल सेलिब्रिटींसारखा परफेक्ट लूक-दिसाल आकर्षक...

अनेकदा चुकीच्या फिटिंगच्या किंवा साध्या डिझाइनच्या कुर्त्यांमुळे शरीर (kurti design for skinny girls) अधिकच बारीक दिसते. परंतु योग्य पॅटर्न, कट आणि फॅब्रिक निवडल्यास तुमची फिगर अधिक सुंदर, संतुलित आणि आकर्षक दिसू शकते. विशेषतः कुर्तींच्या बाबतीत काही ठराविक डिझाइन्स अशा असतात ज्या सडपातळ शरीरयष्टीला परफेक्ट सूट होतात. शरीराने खूपच बारीक असाल तर कोणत्या प्रकारच्या कुर्तीज घालाव्यात, कोणते पॅटर्न निवडावेत आणि साधासुधा लूक अधिक कसा खुलून येईल ते पाहूयात...

कुर्तीत गबाळ्या-लुकड्या दिसता, ‘या’ ७ प्रकारच्या कुर्ती घ्या- मिळेल सेलिब्रिटींसारखा परफेक्ट लूक-दिसाल आकर्षक...

शरीराने बारीक असणाऱ्या मुलींना अनेकदा असा प्रश्न पडतो की त्यांनी नक्की (best kurti for skinny body shape) कोणत्या प्रकारच्या कुर्तीज निवडाव्यात, जेणेकरून त्या खूपच सडपातळ दिसणार नाहीत आणि त्यांची फिगर उठून दिसेल. योग्य कपड्यांची निवड तुमची शरीरयष्टी अधिक संतुलित आणि आकर्षक दाखवू शकते.

कुर्तीत गबाळ्या-लुकड्या दिसता, ‘या’ ७ प्रकारच्या कुर्ती घ्या- मिळेल सेलिब्रिटींसारखा परफेक्ट लूक-दिसाल आकर्षक...

नायरा कट कुर्तीची सर्वात मोठी खासियत म्हणजे यात 'हाय स्लिट' असतो. ही कुर्ती छातीपासून कमरेपर्यंत फिट असते आणि कमरेच्या अगदी वरच्या भागापासून याला बाजूला कट (Side Slits) असतात. ही कुर्ती कमरेच्या थोड्या वरच्या बाजूला फिट असल्याने तुमची कंबर सुबक दिसते आणि तिथून सुरू होणाऱ्या प्लेट्स (Pleats) मुळे खालच्या भागाला चांगला घेर मिळतो. खालच्या बाजूला भरपूर फ्लेअर दिलेला असल्यामुळे फिगर अधिक उठून आणि कर्व्ही दिसते. ज्या मुलींचे पाय खूप बारीक आहेत, त्यांच्यासाठी ही कुर्ती उत्तम आहे. यातील घेर आणि बाजूचे कट्स पायांचा बारीकपणा झाकण्यास मदत करतात आणि शरीराला एक संतुलित आकार देतात.जर तुमची उंची कमी असेल आणि तुम्ही बारीक असाल, तर नायरा कट कुर्ती तुम्हाला उंच आणि 'कर्वी' दाखवण्यासाठी मदत करते.

कुर्तीत गबाळ्या-लुकड्या दिसता, ‘या’ ७ प्रकारच्या कुर्ती घ्या- मिळेल सेलिब्रिटींसारखा परफेक्ट लूक-दिसाल आकर्षक...

जॅकेट स्टाईल कुर्ती हा पॅटर्न बारीक शरीरयष्टीसाठी खूपच परफेक्ट मानला जातो. कुर्तीवर घातलेले जॅकेट लेयर्ड लूक तयार करते, ज्यामुळे फिगरला चांगला शेप मिळतो आणि शरीर अधिक भरदार दिसते. या प्रकारच्या कुर्तीमध्ये साध्या कुर्तीवर एक अतिरिक्त लेयर म्हणजेच जॅकेट असते. हे जॅकेट कुर्तीला जोडून असू शकते किंवा वेगळे देखील असू शकते. जर तुमची कंबर खूपच बारीक असेल, तर तुम्ही जॅकेटला दोरीने किंवा बटणाने बांधून एक सुंदर 'कर्वी' लूक मिळवू शकता.

कुर्तीत गबाळ्या-लुकड्या दिसता, ‘या’ ७ प्रकारच्या कुर्ती घ्या- मिळेल सेलिब्रिटींसारखा परफेक्ट लूक-दिसाल आकर्षक...

अनारकली कुर्त्यांचा घेर मोठा असल्यामुळे शरीराला छान शेप मिळतो. विशेषतः सण-समारंभात हा पॅटर्न बारीक फिगरसाठी अतिशय आकर्षक दिसतो. या कुर्तीला कमरेपासून खाली खूप मोठा घेर असतो. यामुळे खालच्या भागाला व्हॉल्यूम मिळतो आणि तुम्ही खूप बारीक दिसत नाही. जास्त घेर असलेल्या आणि गडद रंगाच्या अनारकली निवडाव्यात.

कुर्तीत गबाळ्या-लुकड्या दिसता, ‘या’ ७ प्रकारच्या कुर्ती घ्या- मिळेल सेलिब्रिटींसारखा परफेक्ट लूक-दिसाल आकर्षक...

कंबरेजवळ फ्लेअर असलेल्या पेप्लम कुर्त्यांमुळे फिगर कर्व्ही दिसते. हा पॅटर्न तरुण मुलींमध्ये सध्या खूप लोकप्रिय आहे. हा पॅटर्न बारीक मुलींच्या शरीराला एक 'कर्वी' लूक देतो. यामुळे तुमची कंबर अधिक सुबक दिसते आणि फिगर संतुलित वाटते.

कुर्तीत गबाळ्या-लुकड्या दिसता, ‘या’ ७ प्रकारच्या कुर्ती घ्या- मिळेल सेलिब्रिटींसारखा परफेक्ट लूक-दिसाल आकर्षक...

ए - लाईन कुर्ती वरून फिट आणि खालच्या बाजूला थोडी पसरलेली असल्यामुळे फिगर शेपमध्ये दिसते. हा पॅटर्न बारीक शरीरावर भरदार लूक देतो आणि रोजच्या वापरासाठीही परफेक्ट असतो. या कुर्तीला 'A-लाईन' म्हणतात कारण याचा आकार इंग्रजीतील 'A' अक्षरासारखा असतो. ही कुर्ती खांद्यापाशी फिट असते आणि खाली जाताना हळूहळू पसरत जाते. ही कुर्ती कमरेपाशी फारशी घट्ट नसते, त्यामुळे शरीराचा बारीकपणा उठून दिसत नाही आणि तुम्हाला वावरतानाही कम्फर्टेबल वाटते.

कुर्तीत गबाळ्या-लुकड्या दिसता, ‘या’ ७ प्रकारच्या कुर्ती घ्या- मिळेल सेलिब्रिटींसारखा परफेक्ट लूक-दिसाल आकर्षक...

अंगरखा कुर्तीमध्ये कापड एकावर एक ओव्हरलॅप केलेले असते आणि बाजूला गाठ असते. यामुळे छातीच्या भागाला आणि कमरेला एक प्रकारचा परफेक्ट शेप मिळतो, ज्यामुळे फिगर व्यवस्थित शेपमध्ये असलेली दिसते.

कुर्तीत गबाळ्या-लुकड्या दिसता, ‘या’ ७ प्रकारच्या कुर्ती घ्या- मिळेल सेलिब्रिटींसारखा परफेक्ट लूक-दिसाल आकर्षक...

आजकाल फ्रिल असलेल्या बाह्या किंवा गळ्यापाशी रफल्स असलेल्या कुर्तीज खूप ट्रेंडमध्ये आहेत. बारीक मुलींनी गळ्यापाशी आणि बाह्यांवर डिझाइन असलेल्या कुर्तीज निवडाव्यात, यामुळे शरीराचा आकार व्यवस्थित शेपमध्ये दिसतो.