साडी असो की कुर्ती, प्रत्येक ड्रेसवर शोभून दिसते कोल्हापूरी चप्पल, पायही दुखणार नाहीत..
Updated:June 29, 2025 15:46 IST2025-06-29T15:41:27+5:302025-06-29T15:46:16+5:30
Kolhapuri chappal style tips : traditional footwear for all outfits: saree and kurti footwear ideas: जाणून घेऊया कोल्हापुरी चप्पलचे एथनिक आणि क्लासी लूक्स.

नवनवीन फॅशन आणि बदलत्या ट्रेंडमुळे महिला दररोज त्यांच्या लूकमध्ये भर घालत असतात. त्यात ट्रेंडी आउटफिट्स असो किंवा स्टायलिश सॅण्डल असो. शोभतील असेच आउटफिट्स त्या निवडतात. (saree and kurti footwear ideas)
साडी असो किंवा कुर्ती प्रत्येक फॅशनवर कोल्हापुरी साज नेहमीच शोभून दिसतो. ही शैली अनेक वर्षांपासून महिलांच्या मनावर राज्य करत आहे. जाणून घेऊया कोल्हापुरी चप्पलचे एथनिक आणि क्लासी लूक्स. (Kolhapuri chappal style tips)
फॅन्सी स्टाईल सॅण्डल घालायला आवडत असेल तर ज्वेलरी स्टाइल कोल्हापुरी चप्पल आपण निवडू शकतो. आपली कुर्ती साधी असेल तर ही सॅण्डल शोभून दिसेल.
फुलांनी सजलेली कोल्हापुरी चप्पल या प्रकारची डिझाइन खूप स्टायलिश आणि अनोखी असते. सलावर सूटसोबत अशी चप्पल आपण घालू शकतो.
जर आपल्याला बोहो लूक हवा असेल तर कोल्हापुरी स्लिपर डिझाइन निवडू शकता. जीन्स, कुर्ती अशा अनेक कपड्यांवर शोभून दिसते.
लेस वर्क कोल्हापुरी चप्पल ही डिझाइन्स आपल्याला बाजारात अनेकदा पाहायला मिळाली असेल. कोणत्याही पार्टी किंवा फंक्शनमध्ये आपण घालू शकतो.
फ्रिल स्टाईल कोल्हापुरी चप्पल ही आपण इंडो-वेस्टर्न स्टाईलमध्ये कॅरी करायला सोपी आहे. तसेच आपण याला जीन्ससोबत देखील घालू शकतो.