पारंपरिक खणाचा मॉडर्न ट्रेंड! खणाच्या दागिन्यांचा सुंदर साज, शोभून दिसतील असे 'खण'खणीत दागिने...
Updated:March 10, 2025 17:40 IST2025-03-10T17:26:26+5:302025-03-10T17:40:25+5:30
Khanache Dagine : Khan Fabric Jewellery : Khan Cloth Jewellery : कानातल्यांपासून ते हातातल्या बांगड्यांपर्यंत खणाच्या दागिन्यांचे एक से बढकर एक पॅटर्न्स...

सध्या जुनीच फॅशन पुन्हा ट्रेंडमध्ये येत असल्याचे आपण (Khanache Dagine) अनुभवलेच आहे. हल्लीच्या ट्रेंडमध्ये जुना पारंपरिक टच (Khan Fabric Jewellery) अगदी स्पष्ट दिसून येतो. याचप्रमाणे फॅशन जगात मागे पडलेली खणाची फॅशन पुन्हा ट्रेंडमध्ये आली आहे. यातही अनेक मोठमोठ्या सेलिब्रिटीजनी हा खणाचा ट्रेंड अगदी अभिमानाने मिरवला त्यामुळे पुन्हा एकदा या (Khan Cloth Jewellery) 'खण' प्रकारच्या कापडाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.
खणाची फक्त साडीच नाही तर आता चक्क खणाचे दागिने देखील फार मोठ्या प्रमाणांत वापरले जातात. मंगळसूत्रापासून ते गळ्यांतील नेकलेस आणि झुमक्यांपर्यंत सगळेच खणाच्या कापडाचा वापर करुन तयार केले जाते. खणाच्या दागिन्यांचे हे वेगवेगळे 'खण'खणीत पॅटर्न्स पाहूयात.
१. खणाच्या कापडाचा पेंडंट नेकलेस :-
आपण अशा पद्धतीचे खणाच्या कापडाचे पेंडंट असलेला सुंदरसा नेकलेस साडी किंवा ड्रेसवर घालू शकता.
२. लांब नेकलेस :-
खणाचे कापड आणि या कापडाचा सुंदरसा असा काठ वापरुन असे नेकलेस पेंडंट तयार केलेले दिसत आहे. आपण अशा पॅटर्नचा लांब नेकलेस किंवा माळ साडीवर घालू शकता.
३. खणाचा चोकर :-
गळ्याभोवती घट्ट बसणारा हा खणाचा चोकर अगदी उठून दिसतो. या चोकरला खाली नथीचे पेंडंट लावून चोकरला अधिक आकर्षक लूक दिला आहे.
४. खण आणि मोत्याची माळ :-
जर तुम्हाला खण आणि मोत्याच्या माळेचे अनोखे कॉम्बिनेशन हवे असेल तर तुम्ही अशाप्रकारे मोत्याच्या माळेत गुंफलेले मधोमध खणाचे पेंडंट असणारी सुंदरशी अशी नाजूक माळ घालू शकता.
५. खण कानातले :-
खणाच्या फॅब्रिक्सपासून तयार केलेले कानातले खूपच आकर्षक दिसतात.
६. खण झुमका :-
जर आपल्याला बसके कानातले नको असतील तर आपण अशा प्रकारचे सुंदर, नाजूक पण भरीव खणाचे झुमके कानांत घालू शकता.
७. हेव्ही खण नेकलेस :-
जर आपल्याला खूप हेव्ही आणि भरीव लूक हवा असेल तर आपण अशा प्रकारचे थोडे हेव्ही पॅटर्नचे खण नेकलेस घालू शकता.
८. मंगळसूत्र :-
नेकलेस, चोकर, कानातल्यांसोबतच खण फॅब्रिक्सचे पेंडंट असणारे मंगळसूत्र कोणत्याही साडीवर घालू शकता.
९. खण ठुशी :-
जर तुम्हाला साडीवर शोभेल अशी ठुशी घालायची असेल तर या प्रकारची खण फॅब्रिकची ठुशी खूप छान दिसेल.
१०. खण बांगड्या :-
आपण दोन्ही हातात अशा प्रकारच्या खणापासून तयार केलेल्या बांगड्या घालू शकता. ज्या खूप सुंदर आणि नाजुक दिसतात.