लग्नसराईसाठी दागिने- कपडे कसे घ्यावे? करिना कपूरकडून घ्या फॅशन टिप्स- सगळ्यांपेक्षा सुंदर दिसाल
Updated:November 28, 2024 13:26 IST2024-11-28T13:21:06+5:302024-11-28T13:26:19+5:30

लग्नसराईचे दिवस सुरू झाले आहेत. त्यामुळे यंदा कोणत्या लग्नात कसं ड्रेसिंग करायचं, दागिने कोणते घालायचे यासाठी अनेकींची जय्यत तयारी सुरू आहे. आपले कपडे, दागिने, लूक सगळ्यांपेक्षा वेगळा आणि आकर्षक असावा, असं वाटणं अगदी साहजिक आहे.
पण बऱ्याचदा कपडे, दागिने, हेअरस्टाईल हे सगळं ठरवताना एवढा गोंधळ उडतो की ऐनवेळी मग काय करावं ते सुचत नाही. तुमचीही अशीच स्थिती झाली असेल तर बॉलीवूडची सुपरस्टायलिश बेबो म्हणजे करिना कपूर खान हिचे हे काही सुंदर लूक पाहा आणि तिच्याकडून काही टिप्स घ्या...
लग्नसराईसाठी हेवी वर्क असणारा एखादा ड्रेस घालण्याचा विचार असेल तर करिनाप्रमाणे त्यावर फक्त मोठे झुमके घाला. खूप हेवी गळ्यातलं आणि ग्लाॅसी मेकअप करणं टाळा. त्याने तूमचा लूक खूप ओव्हर होतो.
काठपदर साडी नेसणार असाल तर अशा पद्धतीने थोडं वेगळं ब्लाऊज आणि एकदम सिंपल मेकअप असं काही ट्राय करून पाहा. सगळ्यांचे तेच ते मोठमोठे दागिने, ग्लॉसी मेकअप, भरगच्च डिझाईन असणारे हेवी वर्क ब्लाऊज यामध्ये तुम्ही खूप वेगळ्या आणि सोबर दिसाल.
लग्न अगदी जवळच्या व्यक्तीचं असेल आणि तरीही कुर्ता पायजमा घालायचा विचार असेल तर अशा पद्धतीची हेवी वर्क असणारी ओढणी घ्या. यामुळे तुमचा लूक अधिक खुलेल. हेवी वर्क असणारी ओढणी असली की आपोआपच साधा ड्रेसही एकदम भरजरी वाटू लागतो.
लेहेंगा, घागरा असं काही घालण्याचा विचार असेल तर करिनाचा हा लूक एकदा बघाच. असं काही एकदम वेगळं आणि हटके केलं तर नक्कीच चारचौघींत उठून दिसाल.
डिझायनर साडीची निवड करणार असाल तर अशा पद्धतीची ऑर्गेंझा साडी निवडा. कारण या साड्या यावर्षीही खूपच ट्रेण्डमध्ये आहेत.