V नेक आकाराच्या ब्लाऊजवर शोभून दिसतात ६ नेकलेस! पाहा सुंदर लूकसाठी गळ्यात काय घालायचे...

Updated:October 15, 2025 17:42 IST2025-10-15T17:29:17+5:302025-10-15T17:42:55+5:30

Jewellery styling tips for v-neck : necklace for v-neck blouse : v-neck blouse jewellery ideas : best necklace styles for v-neckline : v-neck saree blouse accessories : व्ही नेकलाईच्या ब्लाऊजला अधिक आकर्षक आणि स्टायलिश दिसण्यासाठी गळ्यात कोणत्या पॅटर्नचे नेकलेस घालावेत...

V नेक आकाराच्या ब्लाऊजवर शोभून दिसतात ६ नेकलेस! पाहा सुंदर लूकसाठी गळ्यात काय घालायचे...

साडी किंवा लेहेंग्यासोबतचा व्ही नेकलाईनचा (V-Neckline) ब्लाऊज सध्या फॅशनमध्ये खूपच ट्रेंडिंग आहे. ही नेकलाईन फक्त आकर्षकच दिसत नाही, तर ती गळ्याला एक (v-neck saree blouse accessories) सडपातळ आणि उंच असा सुंदर लूक देते. व्ही नेकलाईन स्टायलिश असली, तरी त्यावर कोणता नेकलेस घालावा, याबद्दल अनेकींचा गोंधळ होतो. कारण योग्य नेकलेस निवडल्यास आपला लूक एकदम हटके दिसतो. याउलट, चुकीचा नेकलेस निवडल्यास संपूर्ण स्टाईल बिघडू शकते.

V नेक आकाराच्या ब्लाऊजवर शोभून दिसतात ६ नेकलेस! पाहा सुंदर लूकसाठी गळ्यात काय घालायचे...

व्ही नेकलाईनवर नेकलेस निवडताना काही गोष्टीकडे काळजीपूर्वक लक्ष देणे गरजेचे असते. नेकलेसची लांबी, डिझाईन आणि त्याचे पॅटर्न जर 'V' आकाराच्या नेकलाईनला शोभेल असे असेल, तर तुम्हाला परफेक्ट आणि क्लासी लूक मिळतो.

V नेक आकाराच्या ब्लाऊजवर शोभून दिसतात ६ नेकलेस! पाहा सुंदर लूकसाठी गळ्यात काय घालायचे...

व्ही नेकलाईच्या ब्लाऊजला अधिक आकर्षक आणि स्टायलिश दिसण्यासाठी गळ्यात कोणत्या प्रकारचे नेकलेस घालावेत, ज्यामुळे तुम्ही प्रत्येक समारंभात फॅशन आयकॉन म्हणून उठून दिसाल ते पॅटर्न पाहूयात...

V नेक आकाराच्या ब्लाऊजवर शोभून दिसतात ६ नेकलेस! पाहा सुंदर लूकसाठी गळ्यात काय घालायचे...

व्ही नेकलाईनच्या V आकाराला शोभून दिसेल असा पेंडंट नेकलेस सर्वात उत्तम दिसतो. हा नेकलेस गळ्याला एक सडपातळ आणि आकर्षक लूक देतो. हा पेंडंट 'V' नेकलाईनच्या टोकापर्यंत किंवा त्याहून थोडा वर असावा.

V नेक आकाराच्या ब्लाऊजवर शोभून दिसतात ६ नेकलेस! पाहा सुंदर लूकसाठी गळ्यात काय घालायचे...

जर तुमचा ब्लाऊज प्लेन असेल आणि तुम्हाला लूकमध्ये बोल्डनेस हवा असेल, तर लहान आणि बारीक चोकर किंवा कॉलर नेकलेस घाला. हा नेकलेस गळ्याच्या हाडांना (Collar Bone) हायलाईट करतो आणि स्टायलिश लूक देतो.

V नेक आकाराच्या ब्लाऊजवर शोभून दिसतात ६ नेकलेस! पाहा सुंदर लूकसाठी गळ्यात काय घालायचे...

साडीला वेस्टर्न टच देण्यासाठी किंवा मॉडर्न लूकसाठी 'लेयरिंग' स्टाईलचा नेकलेस आपण घालू शकता. एक नेकलेस लहान आणि दुसरा त्याहून थोडा लांब, असा 'V' चा आकार तयार होण्याऱ्या नेकल्सची निवड करावी. ही स्टाईल व्ही नेकलाईनला छान कॉम्प्लिमेंट करते.

V नेक आकाराच्या ब्लाऊजवर शोभून दिसतात ६ नेकलेस! पाहा सुंदर लूकसाठी गळ्यात काय घालायचे...

इंग्रजी 'Y' अक्षराच्या आकाराचा, मध्यभागी खाली लटकणारा नेकलेस देखील व्ही - नेकलाईनवर शोभून दिसतो. 'Y' आकाराचे नेकलेस खास व्ही नेकलाईनसाठीच बनलेले असतात. हे नेकलेस V-नेकलाईनच्या आत बरोबर मध्यभागी गळ्यात खाली उतरतात आणि एक सुंदर ड्रॉपिंग इफेक्ट देतात.

V नेक आकाराच्या ब्लाऊजवर शोभून दिसतात ६ नेकलेस! पाहा सुंदर लूकसाठी गळ्यात काय घालायचे...

लग्नसमारंभ किंवा मोठ्या खास कार्यक्रमांसाठी, व्ही नेकलाईनवर एक लांब आणि पारंपरिक हार जसे की, राणी हार किंवा साऊथ इंडियन ज्वेलरी शोभून दिसते. यामुळे तुमचा लूक भव्य आणि पारंपारिक दिसतो.

V नेक आकाराच्या ब्लाऊजवर शोभून दिसतात ६ नेकलेस! पाहा सुंदर लूकसाठी गळ्यात काय घालायचे...

मिनिमलिस्ट लूकसाठी छोट्या पेंडंटसोबतच गोल्ड किंवा डायमंड चेन सर्वोत्तम पर्याय आहे.