साडीचा काठ लावून ब्लाऊज शिवण्याच्या ९ क्लासिक आयडिया! ब्लाऊज दिसेल एकदम हटके, स्टायलिश
Updated:May 27, 2025 16:35 IST2025-05-27T14:29:17+5:302025-05-27T16:35:37+5:30

साडीचा काठ जर थोडा सुबकतेने ब्लाऊज शिवण्यासाठी वापरला तर ब्लाऊजला खूप मस्त लूक येऊ शकतो. नेहमीच्या त्याच त्या डिझाईनपेक्षा तुमचे ब्लाऊज एकदम हटके वाटू शकते.
साडीचा काठ तर नाजूक असेल तर मागचा गळा डिझाईन करण्यासाठी तो अशा पद्धतीने वापरता येईल.
काही साड्यांचे काठ खूप मोठे असतात. ते बाह्यांच्या ऐवजी अशा पद्धतीने मागचा गळा डिझाईन करायला वापरता येतात.
साड्यांचे मोठे काठ अशा पद्धतीने तुम्ही ब्लाऊजला मागून आणि पुढून लावून ब्लाऊज आणखी आकर्षक करू शकता.
साडीचा काठ जास्त मोठा नसेल तर अशा पद्धतीने तो ब्लाऊजला पुढच्या बाजुने लावा. ब्लाऊजला मस्त लूक येईल.
जे काठ थोडे मध्यम आकाराचे असतात ते अशा पद्धतीने ब्लाऊजच्या मागच्या गळ्यासाठी वापरू शकता.
समोरच्या पद्धतीने काठ लावून ब्लाऊज अशा पद्धतीनेही छान डिझाईन करता येईल.
साडीचा काठ ब्लाऊजमध्ये अशा पद्धतीने छान आकार देऊनही वापरता येतो.
अशा पद्धतीने दोन पॅचेस लावूनही ब्लाऊजची मागची बाजू काठांनी छान सजवता येऊ शकते.
हे एक क्लासी ब्लाऊज डिझाईन पाहा. साडीचा काठ अतिशय आकर्षक पद्धतीने ब्लाऊजमध्ये वापरण्यात आलेला आहे.