टाइमलेस ब्यूटी-वर्षानूवर्षे नवीकोरी चमकत राहील शिफाॅन साडी, फक्त लक्षात ठेवा ३ सोप्या गोष्टी
Updated:February 13, 2026 09:35 IST2026-02-13T09:30:02+5:302026-02-13T09:35:02+5:30

शिफॉन साडी म्हणजे जवळपास सगळ्याच वयोगटातल्या महिलांसाठी अगदी सोयीस्कर असणारी साडी..(how to take care of chiffon saree?)
आता तर त्यात एवढे छान आकर्षक प्रकार मिळत आहेत की अगदी स्टायलिश तरुणींनाही शिफॉन साडीची भुरळ पडत आहे.(simple tips and tricks to take care of chiffon saree)
ऑफिसपासून पार्टीपर्यंत कुठेही चालणारी ही साडी जर तुम्हाला वर्षांनुवर्षे अगदी नव्यासारखी ठेवायची असेल तर पुढील पद्धतींनी तिची काळजी घ्या.. बघा जुनी झाली तरी नव्यासारखी चमकत राहील तुमची साडी..
जर तुमची साडी प्युअर शिफॉन असेल तर तिला नेहमी ड्रायक्लिन करा. घरी धुण्याच्या फंदात पडू नका. तसेच जर ती सिंथेटीक शिफॉन या प्रकारातली असेल तर मशिन वॉश किंवा साडीला घासून धुणे टाळा. अगदी हलक्या हाताने शाम्पूचं पाणी वापरून साडी धुवा.
शिफॉन साडी अतिशय तलम असते. त्यामुळे ती कधीही अशा साड्यांच्या किंवा कपड्यांच्या संपर्कात ठेवू नका ज्यावर मोती, कुंदन, सेक्विन वर्क केलेलं असेल. कारण अशा गोष्टींमध्ये साडी अडकून तिचे धागे निघू शकतात.
घडी करून ठेवलेल्या शिफाॅन साडीवर इतर साड्यांच्या घड्या ठेवून तिच्यावरचं ओझं वाढवू नका. तसेच ती साडी दिवसेंदिवस हँगरलाही अडकवून ठेवू नका. असं केल्याने तिच्यातले धागे सैलसर होण्यास सुरुवात होते.