पलाझोच नाही, सिगारेट पँट- सूटमध्ये दिसाल बॉस लेडी, पाहा ५ हॉट स्टाइल्स!
Updated:September 17, 2025 09:30 IST2025-09-17T09:30:00+5:302025-09-17T09:30:02+5:30
Women’s cigarette pants : Stylish pant suit for women: Boss lady outfit ideas: ऑफिस लूक असो वा पार्टी, सिगारेट पँट-सूट व्यक्तिमत्व अधि कॉन्फिडंट आणि स्टायलिश दिसतं. पाहूयात ५ पर्याय

फॅशनमध्ये सध्या पँट-सूट एक क्लासिक आउटफिट आहे, पण आता पारंपरिक पलाझो किंवा वाइड लेग पँटच्या जागी सिगारेट पँट-सूटने लोकप्रियता मिळवली आहे. (Women’s cigarette pants)
सिगारेट पँट म्हणजे स्ट्रेट कट पण फिटेड लूक देणारी पँट. यामुळे पाय अधिक स्लिम आणि उंच दिसतात. ऑफिस लूक असो वा पार्टी, सिगारेट पँट-सूट व्यक्तिमत्व अधि कॉन्फिडंट आणि स्टायलिश दिसतं. पाहूयात ५ पर्याय (Stylish pant suit for women)
जर आपल्याला फेस्टिव्हल सीझनमध्ये हटके आणि स्टायलिश कपडे घालायचे असतील तर प्रिटेंड आणि शेड्स असलेले कपडे निवडा. यातील स्टोन वर्क अधिक सुंदर लूक देतो.
सध्या सैल फिट कुर्ता खूप ट्रेंडमध्ये आहे. हे सिगारेट पँटसह अधिक चांगले दिसते. आपण विविध डिझाइन्सनुसार खरेदी करु शकतो.
जर आपल्याला पारंपरिक लूक हवा असेल आणि काही वेगळे ट्राय करायचे असेल तर देसी लूकसाठी सिगारेट पँट आणि गोल फ्रॉक घालू शकता.
लेस वर्क सूट हा चांगला पर्याय आहे. यात आपण शिफॉन किंवा जॉर्जेटपासून बनवलेला सूट खरेदी करु शकतो. ज्यावर सुंदर वर्क केलेले असेल.
स्टायलिश लूकसाठी हॉल्टर नेकलाइन असलेला कुर्ता सेट खरेदी करु शकता. यात बेसिक सिगारेट पँट खूप स्टायलिश लूक देईल.