साडी नेसल्यावर दंड खूपच जाडजूड दिसतात? 'या' पद्धतीने ब्लाऊज शिवा- हात दिसतील सुडौल, देखणे

Updated:May 6, 2025 13:38 IST2025-05-06T13:34:39+5:302025-05-06T13:38:36+5:30

साडी नेसल्यावर दंड खूपच जाडजूड दिसतात? 'या' पद्धतीने ब्लाऊज शिवा- हात दिसतील सुडौल, देखणे

सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. त्यामुळे साड्या नेसणे ओघाने आलेच.. आता साडी नेसल्यावर आपण चारचौघींमध्ये छान उठून दिसायला हवं, असं वाटणं अगदी साहजिक आहे. पण नेमकं होतं काय की अनेक जणी ब्लाऊजच्या बाह्या शिवताना थोडी गल्लत करतात आणि त्यामुळे त्यांचे दंड नेमके जाड दिसतात..

साडी नेसल्यावर दंड खूपच जाडजूड दिसतात? 'या' पद्धतीने ब्लाऊज शिवा- हात दिसतील सुडौल, देखणे

तुमचीही अशीच अडचण असेल तर ब्लाऊजच्या बाह्यांचे डिझाईन्स थोडे बदलून पाहा. यामुळे तुमचे दंड जाड दिसणार नाहीत. त्यासाठी अशा पद्धतीचं ब्लाऊज तुम्ही घेऊन शकता. कोपऱ्यापर्यंत बाह्या घेऊन त्या अगदी टाईट फिटिंगच्या शिवा.

साडी नेसल्यावर दंड खूपच जाडजूड दिसतात? 'या' पद्धतीने ब्लाऊज शिवा- हात दिसतील सुडौल, देखणे

अशा पद्धतीच्या बाह्या घेतल्या तर दंडाचा जो फुगीर भाग असतो, तो व्यवस्थित झाकला जातो आणि हात बारीक दिसतो.

साडी नेसल्यावर दंड खूपच जाडजूड दिसतात? 'या' पद्धतीने ब्लाऊज शिवा- हात दिसतील सुडौल, देखणे

अशा प्रकारच्या फुग्यांच्या बाह्या शिवणार असाल तर त्याचा काठ दंडाला अगदी घट्ट बसणारा हवा.

साडी नेसल्यावर दंड खूपच जाडजूड दिसतात? 'या' पद्धतीने ब्लाऊज शिवा- हात दिसतील सुडौल, देखणे

हाताच्या कोपऱ्यापर्यंत लांब बाह्या असणारे ब्लाऊज शिवले तरी दंडाचा लठ्ठपणा झाकला जातो. पण बाह्यांचे फिटिंग मात्र अगदी व्यवस्थित हवे.

साडी नेसल्यावर दंड खूपच जाडजूड दिसतात? 'या' पद्धतीने ब्लाऊज शिवा- हात दिसतील सुडौल, देखणे

अशा पद्धतीच्या बेल स्लिव्ह्जची सध्या फॅशन आहे. या बाह्या शिवताना त्या दंडाच्या वरच्या भागात घट्ट आणि खाली घेरदार असाव्या. डिझायनर साडीवर असं ब्लाऊज शिवल्यास जास्त स्टायलिश लूक येतो.