सुईदोरा न वापरता २ मिनिटांत करा सैल किंवा घट्ट ब्लाऊज परफेक्ट फिटिंगचे, पाहा ७ ट्रिक्स...

Updated:November 14, 2025 17:01 IST2025-11-14T16:41:44+5:302025-11-14T17:01:32+5:30

how to make blouse fit perfectly : blouse alteration hacks at home : fashion hacks for loose blouse : how to tighten blouse without stitching : blouse fitting problems & solutions : easy hacks to adjust blouse : ब्लाऊजची फिटिंग बिघडल्यामुळे अनेक अडचणी येतात, ऐनवेळी करता येतील असे सोपे उपाय...

सुईदोरा न वापरता २ मिनिटांत करा सैल किंवा घट्ट ब्लाऊज परफेक्ट फिटिंगचे, पाहा ७ ट्रिक्स...

सध्या लग्नासराईचा सिझन जोरदार सुरु आहे...साड्या, ज्वेलरी, मेकअप सगळं वेळेवर तयार असतं, पण अनेकदा आयत्यावेळी ब्लाऊजचे फिटिंग ढिले–टाइट होणे, हुक न लागणे, नेक बसत नसणे किंवा स्लीव्हज त्रास देणे अशा छोट्या - छोट्या समस्या त्रास देतात. अशावेळी स्टिचिंगला वेळ मिळत नाही प्रचंड टेंन्शन येते, पण काळजी करू नका...काही सोपे, झटपट आणि घरच्या घरी करता येणारे उपाय करुन तुम्ही ब्लाऊज लगेच फिट करून साडीमध्ये परफेक्ट दिसू शकता.

सुईदोरा न वापरता २ मिनिटांत करा सैल किंवा घट्ट ब्लाऊज परफेक्ट फिटिंगचे, पाहा ७ ट्रिक्स...

कधी वजन वाढल्यामुळे, तर कधी शिवून ठेवलेले ब्लाऊज अचानक घट्ट झाल्यामुळे, किंवा जुन्या ब्लाऊजची फिटिंग बिघडल्यामुळे ही अडचण येऊ शकते. अशावेळी करता येतील असे काही सोपे उपाय...

सुईदोरा न वापरता २ मिनिटांत करा सैल किंवा घट्ट ब्लाऊज परफेक्ट फिटिंगचे, पाहा ७ ट्रिक्स...

१. ब्लाऊज जर लूज होत असेल तर सुई - धाग्याने हलकीशी धावती शिलाई मारा. यासाठी फक्त २ मिनिटे लागतात.

सुईदोरा न वापरता २ मिनिटांत करा सैल किंवा घट्ट ब्लाऊज परफेक्ट फिटिंगचे, पाहा ७ ट्रिक्स...

२. ब्लाऊजला पटकन डबल साइड फॅशन टेप लावून खांद्यावर फिक्स करा. लूज नेकलाइन किंवा खांद्यावरून सरकणाऱ्या ब्लाऊजसाठी डबल-साइड फॅशन टेप उत्तम उपाय, लगेच फिट बसलेल्यासारखा लुक मिळतो.

सुईदोरा न वापरता २ मिनिटांत करा सैल किंवा घट्ट ब्लाऊज परफेक्ट फिटिंगचे, पाहा ७ ट्रिक्स...

३. थोडी सिलिकॉन क्रीम ब्लाऊजच्या स्लिव्ह्ज वर किंवा त्वचेवर लावल्यास ब्लाऊज परफेक्ट फिटिंगचा होऊन टाईट रहातो.

सुईदोरा न वापरता २ मिनिटांत करा सैल किंवा घट्ट ब्लाऊज परफेक्ट फिटिंगचे, पाहा ७ ट्रिक्स...

४. सैल शिवलेल्या ब्लाऊजला तात्पुरती फिटिंग किंवा टाईटनेस हवा असेल तर ब्लाऊजला सेफ्टी पिन लावून आपल्याला हवे तसे फिटिंग करू शकता.

सुईदोरा न वापरता २ मिनिटांत करा सैल किंवा घट्ट ब्लाऊज परफेक्ट फिटिंगचे, पाहा ७ ट्रिक्स...

५. ब्लाऊजला परफेक्ट फिटिंगमध्ये करण्यासाठी ब्लाऊजचा लूज असलेला भाग आतून थोडा फोल्ड करून त्याला आतल्या बाजूने रबर बँड लावून ठेवावा.

सुईदोरा न वापरता २ मिनिटांत करा सैल किंवा घट्ट ब्लाऊज परफेक्ट फिटिंगचे, पाहा ७ ट्रिक्स...

६. बाजारात ब्लाऊजसाठी एक्सटेंडर हूक (Extender Hooks) मिळतात. हे हुक ब्लाऊजच्या मागील बाजूस जोडून ब्लाऊजला १ ते २ इंच सैल करता येते. ज्यामुळे ब्लाऊज सहज फिट होतो.

सुईदोरा न वापरता २ मिनिटांत करा सैल किंवा घट्ट ब्लाऊज परफेक्ट फिटिंगचे, पाहा ७ ट्रिक्स...

७. ब्लाऊजचे हुक लावण्याच्या भागात १ ते २ इंचाचा कापडी तुकडा शिवून ब्लाऊज ताबडतोब सैल करता येतो, हे घरीही सहज करता येते.