शेपवेअरची कटकट विसरा , साडी नेसल्यावर उंच आणि स्लिम दिसण्यासाठी ५ मॅजिक ट्रिक्स; दिसेल परफेक्ट फिगर

Updated:February 26, 2026 09:41 IST2026-02-25T19:00:00+5:302026-02-26T09:41:40+5:30

Saree styling tips: Look slim in saree: How to look taller: Saree fashion hacks : या ५ ट्रिक्स लक्षात ठेवा, ज्या आपल्याला साडीमध्ये एक इंच ही न घटवता अधिक टोन्ड आणि स्टायलिश दिसण्यास मदत करतील.

शेपवेअरची कटकट विसरा , साडी नेसल्यावर उंच आणि स्लिम दिसण्यासाठी ५ मॅजिक ट्रिक्स; दिसेल परफेक्ट फिगर

अनेकदा साडी नेसल्यानंतर आपल्याला भीती वाटते. मी जाड तर दिसणार नाही ना? माझी उंची कमी वाटणार नाही ना? यामुळे अनेकजण साडी नेसणं टाळतात. सध्या शेपवेअर घालण्याची फॅशन आली आहे. पण तासनतास ते घट्ट शेपवेअर घालून आपल्याला त्रास होतो. साडीमध्ये उंच आणि स्लिम दिसण्यासाठी आपल्याला जिम किंवा महागडे शेपवेअर वापरण्याची गरज नाही. (Saree styling tips)

शेपवेअरची कटकट विसरा , साडी नेसल्यावर उंच आणि स्लिम दिसण्यासाठी ५ मॅजिक ट्रिक्स; दिसेल परफेक्ट फिगर

योग्य कापड, पदराची स्टाईल आणि ब्लाऊजची डिझाईन या तीन गोष्टींचा ताळमेळ बसला की आपण अधिक सुंदर दिसू. या ५ ट्रिक्स लक्षात ठेवा, ज्या आपल्याला साडीमध्ये एक इंच ही न घटवता अधिक टोन्ड आणि स्टायलिश दिसण्यास मदत करतील.(Look slim in saree)

शेपवेअरची कटकट विसरा , साडी नेसल्यावर उंच आणि स्लिम दिसण्यासाठी ५ मॅजिक ट्रिक्स; दिसेल परफेक्ट फिगर

आपल्याला स्लिम दिसायचे असेल तर फुगणाऱ्या साड्या टाळा. त्याऐवजी अंगाला चिकटून राहणारे कापड निवडा. ज्यात शिफॉन, जॉर्जेट, क्रेप किंवा पातळ सिल्कच्या साड्या असतील. ज्यात आपण जाड दिसणार नाही.

शेपवेअरची कटकट विसरा , साडी नेसल्यावर उंच आणि स्लिम दिसण्यासाठी ५ मॅजिक ट्रिक्स; दिसेल परफेक्ट फिगर

साडी खूप वर किंवा बरगड्यांच्या जवळ नेसल्यास उंची कमी वाटते आणि पोटाचा भाग अधिक उठून दिसतो. साडी नेहमी नाभीच्या खाली किंवा नाभीवर नेसावी. यामुळे शरीराचा वरचा आणि खालचा भाग संतुलित राहतो, ज्यामुळे आपण अधिक उंच दिसतो.

शेपवेअरची कटकट विसरा , साडी नेसल्यावर उंच आणि स्लिम दिसण्यासाठी ५ मॅजिक ट्रिक्स; दिसेल परफेक्ट फिगर

आपण जर खांद्यावर पदराच्या प्लेट्स काढत असू तर त्या खूप रुंद न ठेवता अरुंद ठेवा. खांद्यावरच्या अरुंद प्लेट्समुळे आपला खांदा आणि गळा अधिक लांब दिसतो. पदर मोकळा सोडायचा असेल तर व्ही शेपमध्ये पिन करा. ज्यामुळे पोटाचा भाग झाकला जाईल आणि आपण स्लिम दिसू.

शेपवेअरची कटकट विसरा , साडी नेसल्यावर उंच आणि स्लिम दिसण्यासाठी ५ मॅजिक ट्रिक्स; दिसेल परफेक्ट फिगर

साडी नेसताना कलर देखील खूप महत्त्वाचा असतो. नेव्ही ब्लू, ब्लॅक, बॉटल ग्रीन किंवा मरून यामध्ये शरीर सडपातळ दिसते. तसेच बारीक प्रिंट्स किंवा उभ्या रेघांच्या साड्या निवडा. उभ्या रेघांमुळे पाहणाऱ्याच्या नजरेला सलगता मिळते, ज्यामुळे उंची वाढल्याचा भास होतो.

शेपवेअरची कटकट विसरा , साडी नेसल्यावर उंच आणि स्लिम दिसण्यासाठी ५ मॅजिक ट्रिक्स; दिसेल परफेक्ट फिगर

थोडे लांब ब्लाऊज पोटाच्या बाजूची चरबी लपवण्यास मदत करते. तसेच व्ही नेक किंवा स्वीटहार्ट नेक असलेल्या ब्लाऊजमुळे गळा लांब दिसतो, जो तुम्हाला उंच आणि स्लिम दाखवतो.