साधे, स्वस्त कपडेही देतात स्मार्ट, क्लासी लूक- फक्त ५ टिप्स लक्षात ठेवा, नेहमीच स्टायलिश दिसाल
Updated:March 27, 2026 13:20 IST2026-03-27T13:08:50+5:302026-03-27T13:20:59+5:30

स्मार्ट, स्टायलिश आणि रिच लूक येण्यासाठी नेहमी महागडे कपडेच घालायला हवेत असं नाही. कारण योग्य पद्धतीने घातले तर साधे, स्वस्त कपडेही छान स्टायलिश लूक देऊ शकतात.
यासाठी कपड्यांची चॉईस कशी असावी आणि ते कशा पद्धतीने घालावेत ते पाहूया...
सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जे कोणते कपडे निवडाल ते अगदी परफेक्ट फिटिंगचेच असायला हवे. खूप घट्ट किंवा खूप सैलसर कपडे असले की आपोआपच तुमचा लूक खराब होतो.
दुसरी गोष्ट म्हणजे आतले कपडेही व्यवस्थित मापाचे आणि आकाराचे असावेत. कारण आपल्याला जाणवत नसलं तरी त्याचा परिणाम आपल्या इतर कपड्यांवर होतो.
खूप जास्त किंवा खूप मोठमोठाले किंवा ब्राईट रंगाचे दागिने घातल्यानेही बऱ्याचदा आपला लूक खराब होतो. ज्वेलरी जेवढी तुम्ही साधी, सुटसुटीत ठेवाल तेवढं तुम्ही आकर्षक दिसाल.
टॉप आणि बॉटम हे दोन्ही सैलसर असतील तरीही तुमचा लूक बिघडू शकतो. त्यामुळे टॉप टाईट असेल तर बॉटम लूज ठेवा. किंवा टॉप सैलसर असेल तर बॉटम घट्ट असावा.
तुमचे फूटवेअरही खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळे तुमच्या ड्रेसनुसार तुमच्या चपला किंवा बूट निवडा. जास्त छान दिसाल.