1 / 7अगदी कॉलेजपासून ते ऑफिसपर्यंत आणि पार्टीपासून ते पिकनिकपर्यंत कुठेही सहज कुर्तीचे वेगवेगळे प्रकार घातले जातात. वेगवेगळ्या प्रकारचे कुर्ते (How to Choose the Perfect Kurtas for Every Body Type) आपण जेव्हा ट्राय करतो. 2 / 7अशावेळी, आपलंच आपल्याच लक्षात येतं की एखाद्या (Best kurti according to your body shape ) प्रकारच्या कुर्तीमध्ये आपण खूपच स्मार्ट, आकर्षक दिसतो. तर दुसऱ्या एखाद्या प्रकारातली कुर्ती आपल्याला अजिबातच सूट होत नाही. त्यात आपण आहोत त्यापेक्षा अधिक जाड दिसतो नाहीतर मग बारीक दिसतो. त्यामुळेच आपल्या बॉडी शेपनुसार कुर्त्यांची निवड कशी करायची, याविषयी या काही खास टिप्स पाहूयात. 3 / 7पीअर बॉडी शेप म्हणजे ज्या महिलांचे खांदे, छाती व्यवस्थित फिटिंगमध्ये असतात. पण कंबरेचा घेर, हिप्स हा भाग जास्त असतो. जर तुमचा पीअर बॉडी शेप असेल तर आपल्याला अंगरखा, अनारकली, ए- लाईन कुर्ती या तीन प्रकारातील कुर्ते अधिक जास्त चांगले दिसतील. 4 / 7हवर ग्लास बॉडी शेप असणाऱ्या महिलांना फिट अँड फ्लेअयर, बेल्टेड किंवा अनारकली कुर्तीज अगदी व्यवस्थित फिटिंगला बसतात. 5 / 7जर तुमचा ॲप्पल बॉडी शेप असेल तर आपल्याला अँमपायर वेस्ट, स्ट्रेट कट, ए- लाईन कुर्तीज अधिक चांगल्या दिसू शकतात. 6 / 7 जर तुमचा बॉडी शेप रेक्टअँगल असेल तर आपण लेअर्ड, हाय अँड लो, पेम्पलम स्टाईल कुर्तीजची निवड करावी. 7 / 7इन्व्हर्टेड ट्रँगल बॉडी शेप असेल तर आपण ए- लाईन कुर्ती किंवा अनारकली, पँनलल्ड प्रकारातील कुर्तीजची निवड करावी.