सगळ्याच प्रकारच्या साड्यांवर ठेवणीतले दागिने घालू नका, साडीनुसार दागिन्यांची निवड करण्यासाठी ५ टिप्स
Updated:November 15, 2025 09:30 IST2025-11-15T09:28:27+5:302025-11-15T09:30:02+5:30

एकच एक प्रकारचे दागिने तुम्ही सगळ्याच प्रकारच्या साड्यांवर घालत असाल तर त्यामुळे तुम्ही खूप साचेबद्ध दिसाल. शिवाय तुमची साडी, तुमचा लूक आणि दागिनेही उठून दिसणार नाहीत.
म्हणूनच नेहमीच साडीच्या प्रकारानुसार दागिन्यांची निवड करायला हवी. त्यासाठीच या काही टिप्स पाहा आणि साडीनुसार कोणते दागिने घालायचे ते ठरवा..
खण, कॉटन, लीनन या प्रकारातल्या साड्या असतील तर त्यावर ऑक्सिडाईज ज्वेलरी घाला.
सिल्क, सेमी सिल्क प्रकारातल्या साड्या असतील तर त्यावर सोन्याचे किंवा गोल्डन पॉलिशचे दागिने घाला.
जर तुमची साडी ऑर्गेंझा प्रकारातली असेल तर त्यावर खड्यांचे, स्टोनचे दागिने घाला.
प्लेन साडी असेल किंवा नाजुक डिझाईन असणारी फ्रेश, फिक्या रंगाची साडी असेल तर मोत्याचे दागिने छान दिसतील.
जर नऊवारी नेसणार असाल तर तिच्यावर हमखास सोन्याचे पारंपरिक दागिने घाला.