चेहऱ्यानुसार ‘असे’ निवडा कानातले, पाहा गोल-चौकोनी-लांबट चेहऱ्यावर कोणते कानातले शोभून दिसतात..
Updated:February 9, 2026 19:00 IST2026-02-09T19:00:00+5:302026-02-09T19:00:02+5:30
Earrings according to face shape: Best earrings for face shape: Best earrings for face shape: आपल्या चेहऱ्यानुसार आपण कोणत्या पद्धतीचे कानातले निवडायला हवे, पाहूया

कोणत्याही खास प्रसंगी किंवा सण-समारंभात आपण अतिशय हौसेने महागडी साडी किंवा डिझायनर ड्रेस खरेदी करतो. पण अनेकदा असं होतं की इतकं नटून-थटूनही आरशात पाहिल्यावर लूक आपला पूर्ण होत नाही. त्याच कारणं असतं आपण निवडलेले चुकीचे दागिने. (Earrings according to face shape)
आपल्या चेहऱ्यानुसार आपण कोणत्या पद्धतीचे कानातले निवडायला हवे, पाहूया. ज्यामुळे आपल्या सौंदर्यात अधिक भर पडेल. (Best earrings for face shape)
ज्यांचा चेहरा गोल असतो, त्यांच्या गालांचे हाड थोडे रुंद असतात. अशा चेहऱ्याला थोडे 'स्लिम' आणि लांबट दाखवण्यासाठी लांब लोंबणारे कानातले चांगले दिसतात.
ओव्हल किंवा अंडाकृती चेहरा असणाऱ्या सर्व प्रकारचे कानातले सूट होतात. मोठे झुमके, स्टड्स किंवा सुई-धागा स्टाईल कानातले अधिक छान दिसतील.
चौकोनी चेहरा असणाऱ्यांनी गोल आकाराचे दागिने निवडायला हवे. मोठे गोल हुप्स, गोल चांदबाली किंवा ओव्हल आकाराचे कानातले आपल्या चेहऱ्यावर खूप सुंदर दिसतील.
आपला चेहरा लांबट असेल तर स्टड्स, कानाला चिकटून असलेले मोठे टॉप्स किंवा गोलाकार झुमके वापरा.
हार्ट शेप चेहरा असणाऱ्यांनी टियर-ड्रॉप इअररिंग्स किंवा झुमके वापरायला हवे. यामुळे आपले सौंदर्य अधिक खुलून दिसते.