टाईट पँट्स- लेंगिन्स घातल्यानंतर कॅमल टो- बॉडीशेप विचित्र दिसतो? ४ सोप्या टिप्स, ऑकवर्डही वाटणार नाही
Updated:December 29, 2025 20:00 IST2025-12-29T20:00:00+5:302025-12-29T20:00:02+5:30
camel toe problem: tight pants fashion tips: leggings styling tips: काही सोप्या आणि स्मार्ट टिप्स वापरल्या तर कॅमल टो- बॉडीशेप विचित्र अडचण सहज टाळता येईल.

आजकाल लेंगिन्स, जॉगर्स, योगा पँट्स किंवा स्किनी फिट पँट्स या महिलांच्या वॉर्डरोबचा सगळ्यात महत्त्वाचा भाग बनवला आहे. सगळ्यात कम्फर्टेबल, स्टायलिश आणि कोणत्याही टॉपवर सहज मॅच होणारे कपडे. अगदी ऑफिसपासून जिमपर्यंत सगळीकडे वापरता येतात. (camel toe problem)
टाईट पँट्स किंवा लेंगिन्स घातल्यानंतर अनेकांना ऑकवर्डही फिल होते. कॅमल टो किंवा बॉडीशेप विचित्र पद्धतीने दिसतो. यामुळे आपला आत्मविश्वास कमी होतो, चालताना किंवा बसताना सतत अस्वस्थ वाटतं आणि आपल्याला ऑकवर्डही फिल होते. अशावेळी काही सोप्या आणि स्मार्ट टिप्स वापरल्या तर ही अडचण सहज टाळता येईल. (tight pants fashion tips)
आपण स्किन रंगाच्या लेंगिन्स घालणे टाळायला हवे. आपल्या त्वचेच्या रंगाशी जुळणारे कपडे विचित्र दिसतात. आपण घराबाहेर किंवा ऑफिसला जात असाल तर काळा, राखाडी किंवा नेव्ही ब्लू रंगाचे कपडे निवडा.
ट्रान्सपरंट लेंगिन्स किंवा टाईंट पँट्स घालणे टाळा. आपण निवडलेल्या कपड्यांची फॅब्रिकता खराब असेल किंवा आकार योग्य नसेल तर त्यातून आपली त्वचा दिसते. ज्यामुळे ऑकवर्ड वाटते.
आपण लेंगिन्स किंवा पँट्स निवडताना मिडल सीम असलेल्या लेंगिन्स घेऊ नका. सीमलेस किंवा वेगळ्या पॅटर्नची पॅन्ट निवडा.
योग्य इनरवेअर निवडणं देखील खूप महत्त्वाचं आहे. सीमलेस, नो-शो पँटी वापरल्यास शेप नीट दिसतो. आपण पँटी लाइनर किंवा खास कॅमल टो कव्हर वापरू शकता.
लेंगिन्स कधीही शॉर्ट टॉप्ससोबत घालू नका. लेंगिन्स शरीराला परिपूर्ण आकार देते, म्हणून त्यांना नेहमी लांब कुर्ता, लांब टॉप किंवा ट्यूनिकसोबत घाला. यामुळे आपला लूक सुंदर दिसतो.
लेंगिन्स प्रत्येक कपड्यांसोबत सूट होत नाही. काही सूट चुडीदारांसोबत चांगले दिसतात. पण लेंगिन्स घातल्याने आपला लूक खराब होतो. म्हणून आपल्या कपड्यांशी जुळणारे बॉटम निवडणे अत्यंत महत्वाचे आहे.