हत्ती झुमका, व्हाट झुमका? पाहा हत्ती झुमका कानातल्यांचे ८ सुंदर पॅटर्न, कानातल्यांची नवीच फॅन
Updated:November 26, 2024 17:10 IST2024-11-25T15:58:44+5:302024-11-26T17:10:44+5:30

कधी कोणत्या दागिन्यांची फॅशन येईल काही सांगता येत नाही. आता हेच पाहा ना सध्या लग्नसराईनिमित्त हाथी झुमका किंवा हत्ती झुमका कानातले खूप जास्त ट्रेण्डमध्ये आहेत.
कानातल्यांचा हा एक अगदी नवा प्रकार सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे.
पुर्वी मोराचे कानातले, मोराचे झुमके हे प्रकार ट्रेण्डिंग होते. आता मात्र अशा पद्धतीचे हत्ती झुमके तरुणींचे लक्ष वेधून घेत आहेत.
हाथी झुमका या प्रकारात तुम्हाला ऑक्सिडाईज प्रकारातलेही कित्येक नवनवे डिझाईन्स मिळतील.
हत्ती झुमका प्रकारातलं हे एक आकर्षक डिझाईन पाहा. थोडे मोठे कानातले आवडत असतील तर हे डिझाईन तुम्ही घेऊ शकता.
झुमका प्रकारातले कानातले आवडत नसतील तर हे साधे टॉप्सही मिळतील. ते सुद्धा दररोज ऑफिसला, कॉलेजमध्ये घालायला छान दिसतात.
लोंबत्या कानातल्यांचाच हा एक सुंदर आणि नाजूक प्रकार पाहा. ज्यांना खूप मोठमोठे कानातले आवडत नाहीत, त्यांना अशा प्रकारचे हत्ती झुमके आवडू शकतात.
हत्ती झुमके प्रकारातला हा आणखी एक वेगळा पॅटर्न. अशा प्रकारचे झुमके तुम्ही तुमच्या शहरातल्या स्थानिक बाजारातूनही घेऊ शकता किंवा मग ऑनलाईन शॉपिंग साईटवरही ते उपलब्ध आहेत. १०० ते ३०० रुपये एवढी या कानातल्यांची किंमत आहे.