Gudipadwa 2026 : आजीच्या पारंपरिक मोत्याच्या कुडीचं नवं रुप, पाहा मोती कुडी चोकर नेकलेसचे १० सुंदर डिझाईन्स

Updated:March 15, 2026 09:59 IST2026-03-13T20:00:00+5:302026-03-15T09:59:53+5:30

Top 10 Moti Kudi Choker designs for weddings: How to style pearl choker with Paithani: पाहूयात 'मोती कुडी चोकर'चे १० सुंदर डिझाईन्स.

Gudipadwa 2026 : आजीच्या पारंपरिक मोत्याच्या कुडीचं नवं रुप, पाहा मोती कुडी चोकर नेकलेसचे १० सुंदर डिझाईन्स

काळाच्या ओघात फॅशन बदलली तरी त्याचं आकर्षण पिढ्यानुपिढ्या कायम राहतं. असाच एक पारंपरिक आणि अत्यंत लोभस दागिना म्हणजे मोती कुडी. आपल्या आजी-पणजीच्या काळी गळ्यात मोठी मोत्यांची कुडी ही सौंदर्याचं लक्षण मानली जायची. पण आज याच पारंपरिक 'कुडी'ला आधुनिकतेची जोड देऊन 'मोती कुडी चोकर' (Moti Kudi Choker) हा प्रकार फॅशन विश्वात तुफान व्हायरल होत आहे. (How to style pearl choker with Paithani)

Gudipadwa 2026 : आजीच्या पारंपरिक मोत्याच्या कुडीचं नवं रुप, पाहा मोती कुडी चोकर नेकलेसचे १० सुंदर डिझाईन्स

सण-समारंभ असो किंवा लग्नसराई, नऊवारी साडीवरचा आपला साज या नखरेल दागिन्याशिवाय अपूर्णच वाटतो. हा चोकर कोणत्याही साडीवर किंवा अगदी इंडो-वेस्टर्न ड्रेसवरही उठून दिसतो. पाहूयात 'मोती कुडी चोकर'चे १० सुंदर डिझाईन्स. (Top 10 Moti Kudi Choker designs for weddings)

Gudipadwa 2026 : आजीच्या पारंपरिक मोत्याच्या कुडीचं नवं रुप, पाहा मोती कुडी चोकर नेकलेसचे १० सुंदर डिझाईन्स

मोत्यांच्या शुभ्र कळ्या आणि गुलाबी खड्यांचे मिश्रण आपल्या पारंपरिक लूकला राजेशाही थाट देईल. या चोकरमध्ये सोनसाखळ्या देखील आहे. ज्यामुळे त्याचा लूक अधिक सुंदर दिसतो. ही कुडी आपल्याला नऊवारी किंवा पैठणीवर छान दिसेल.

Gudipadwa 2026 : आजीच्या पारंपरिक मोत्याच्या कुडीचं नवं रुप, पाहा मोती कुडी चोकर नेकलेसचे १० सुंदर डिझाईन्स

आपल्या गुढीपाडव्याला अस्मिता जपणारं आणि सौंदर्यात भर घालणारं चंद्रकोर डिझाइनची मोती कुडी चोकर ट्राय करु शकतो. यासोबत मॅचिंग मंगळसूत्र देखील मिळत. हे सण-समारंभ, लग्नसोहळ्यात किंवा पूजेमध्ये घालता येतं.

Gudipadwa 2026 : आजीच्या पारंपरिक मोत्याच्या कुडीचं नवं रुप, पाहा मोती कुडी चोकर नेकलेसचे १० सुंदर डिझाईन्स

चोकरच्या मध्यभागी आणि बाजूला मोराची अत्यंत सुंदर कलाकुसर केलेली नक्षी आहे. जी आपल्या दागिन्याला पारंपरिक लूक देते. यात कुंदन खडे आहेत.

Gudipadwa 2026 : आजीच्या पारंपरिक मोत्याच्या कुडीचं नवं रुप, पाहा मोती कुडी चोकर नेकलेसचे १० सुंदर डिझाईन्स

यात मराठमोळी अस्मिता जपणारं आणि सौंदर्यात भर घालणारं 'चंद्रकोर' डिझाइन वापरण्यात आले आहे. कलेससोबतच मॅचिंग मंगळसूत्र असल्यामुळे हा संच सण-समारंभ, लग्नसोहळे किंवा पूजेसाठी परिधान करायला अगदी योग्य आहे.

Gudipadwa 2026 : आजीच्या पारंपरिक मोत्याच्या कुडीचं नवं रुप, पाहा मोती कुडी चोकर नेकलेसचे १० सुंदर डिझाईन्स

पाची कुंदन वर्क हा दागिन्यांचा सुंदर प्रकार असून यात कुंदन खड्यांची मांडणी अत्यंत राजेशाही दिसते. यात असणाऱ्या मोत्यांच्या अनेक पदरी सरींमुळे हा चोकर गळ्याला व्यवस्थित बसतो आणि आपल्याला भरीव लूक देतो.

Gudipadwa 2026 : आजीच्या पारंपरिक मोत्याच्या कुडीचं नवं रुप, पाहा मोती कुडी चोकर नेकलेसचे १० सुंदर डिझाईन्स

हा मोत्याचा चोकर पारिजात फुलाप्रमाणे नाजूक आणि सुबक रचनेमुळे या दागिन्याला एक वेगळी ओळख मिळते. यात असणारे पांढरे शुभ्र मोती, रंगीत खड्यांचे हे कॉम्बिनेशन पैठणी किंवा कोणत्याही सिल्क साडीवर उठून दिसतात.