Join us   

गुढीपाडवा स्पेशल: पारंपरिक मराठी दागिन्यांची श्रीमंती, बघा महाराष्ट्राची ओळख सांगणारे १२ मराठमोळे दागिने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2024 1:11 PM

1 / 13
गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्षाची सुरुवात (Gudi Padwa 2024). यानिमित्ताने जर मराठी लूक करणार असाल किंवा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर (Gudi Padwa 2024 Marathi) दागिन्यांची खरेदी करायची असेल तर हे काही पारंपरिक मराठी दागिने पाहून घ्या...
2 / 13
नथ हा महाराष्ट्राची ओळख सांगणारा दागिना. या नथीशिवाय पारंपरिक मराठी वेशभुषा नाहीच.
3 / 13
कानातल्या अशा पद्धतीच्या बुगड्याही केवळ महाराष्ट्रातच दिसतात.
4 / 13
या मोत्यांच्या कुड्या ही देखील महाराष्ट्राची ओळख.
5 / 13
महाराष्ट्रात पुर्वी महिला केसांचे खोपे घालायच्या. त्या खोप्यांना ही पिन लावली जायची. खोपा पिन म्हणून ती ओळखली जाते.
6 / 13
हा आहे गळ्यात घालायचा तन्मणी. हा देखील एक पारंपरिक मराठी दागिना आहे.
7 / 13
तन्मणी गळ्यात घातला तर त्याच्या जोडीला गळ्यालगत हा चिंचपेटी म्हणून ओळखला जाणारा दागिना घातला जातो.
8 / 13
बोरमाळ किंवा मोहन माळ हा एक जुना मराठी दागिना आहे.
9 / 13
पुर्वी बऱ्याच महिलांच्या गळ्यात अशा पद्धतीची एकदाणी दिसायची. हल्ली दोन- तीन पदरांमध्येही एकदाणी मिळते.
10 / 13
याला म्हणतात पोहेहार. काही ठिकाणी हा श्रीमंत हार म्हणूनही ओळखला जातो.
11 / 13
बकुळीच्या सुंदर फुलांचं डिझाईन असणारा हा बकुळहारही महाराष्ट्राची ओळख आहे.
12 / 13
गळ्यालगत असणारा हा दागिना म्हणजे ठुशी.
13 / 13
ठुशीऐवजी काही जणी अशी वजरटिक घालतात. यालाच कोल्हापुरी साज म्हणूनही ओळखले जाते.
टॅग्स : फॅशनदागिनेगुढीपाडवामराठी