गुढीसोबत सुंदर फोटो कसा काढायचा? सेलिब्रिटींकडून घ्या आयडिया- सोशल मिडियात मिळतील भरपूर लाईक्स
Updated:April 9, 2024 15:37 IST2024-04-09T09:10:07+5:302024-04-09T15:37:08+5:30

गुढीपाडव्याला आपण एवढ्या उत्साहात तयार हाेऊन गुढी उभारतो. त्यामुळे एक छानसा फोटो काढणं आणि तो सोशल मिडियावर अपलोड करणं तर बनता ही है ना यार....पण नेमकं होतं असं की फोटो काढण्यासाठी एखादी भारी पोजच सुचत नाही.
म्हणूनच तर मराठी सेलिब्रिटींकडून या काही खास आयडिया घ्या आणि गुढीसोबत तुमचा एकदम झकास फोटो काढा. तो फोटो सोशल मिडियावर अपलोड करताच बघा कसे चिक्कार लाईक्स मिळतील.
नऊवार नेसून अमृता खानविलकरने दिलेली ही एक स्टायलिश पोज बघा...
श्रुती मराठेची ही पोजही अगदी साधी पण तेवढीच आकर्षक आहे.
कॅमेऱ्याकडे न पाहता असं थोडं बाजूला पाहिलं तरी अशा प्रकारचा खूप छान फोटो येऊ शकतो.
प्रसन्न चेहऱ्याने असं गुढीच्या बाजुला नुसतं उभं राहिलं तरी खूप छान फोटो येऊ शकतो.
जोडीने फोटो काढायचा असेल तर अशी एखादी पोझ घेऊ शकता.
अशा पद्धतीचा एखादा फोटोही छान वाटतो.
अंकिता लोखंडेही ही पोझ एकदम मस्त वाटू शकते.