सत्यनारायणाची पूजा असो की वास्तूशांत, नेसा स्पेशल गजराज राजेशाही पैठणी! पूजेच्या दिवशी खास महाराणी लूक...
Updated:February 10, 2026 21:45 IST2026-02-10T21:45:00+5:302026-02-10T21:45:02+5:30
Gajraj Design Paithani : Gajraj Design Paithani Saree : elephant design paithani saree : traditional gajraj paithani : लग्नांनंतरच्या सत्यनारायण पूजेसाठी आता गजराज पैठणीचा खास ट्रेंड...

लग्नानंतरची पहिली सत्यनारायण पूजा, हा प्रत्येक नववधूसाठी अतिशय खास क्षण असतो. या खास दिवशी नेसलेली साडी केवळ सुंदरच नाही तर शुभ, पारंपरिक आणि अर्थपूर्ण असावी अशी प्रत्येकीची इच्छा असते. या मंगल प्रसंगी पारंपारिक आणि तितकाच (gajraj paithani for satyanarayan pooja) राजेशाही लुक हवा असेल, तर 'गजराज पैठणी'ला (Gajraj Paithani) पर्याय नाही.
पैठणी म्हटलं की, डोळ्यासमोर मोर आणि पोपट यांचे नक्षीकाम असलेली (gajraj design paithani saree for wedding) भरजरी काठ असलेली पैठणी येते. पण सध्या साडीच्या पदरावर आणि काठावर हत्तीची नक्षी असलेली 'गजराज पैठणी' फॅशन ट्रेंडमध्ये फारच लोकप्रिय आहे.
पैठणीच्या पदरावर किंवा काठावर नक्षीकाम केलेले हत्ती (गजराज) हे समृद्धी, सौभाग्य, ऐश्वर्य आणि शुभारंभाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे सत्यनारायण पूजेसारख्या धार्मिक विधीसाठी गजराज पैठणीला विशेष महत्त्व आहे. रेशमी कापड, सोनसळी जरी आणि पारंपरिक रंगसंगतीमुळे ही पैठणी नववधूच्या सौंदर्यात अधिक भर घालते.
हत्ती हा ऐश्वर्य, समृद्धी आणि शक्तीचे प्रतीक मानला जातो, त्यामुळे पूजेच्या पवित्र प्रसंगी ही साडी तुम्हाला एक वेगळाच लूक मिळवून देते.
गजराज पैठणीचे मुख्य आकर्षण म्हणजे तिचा पदर. या साडीच्या पदरावर अतिशय सुबकपणे हत्तीच्या प्रतिमा विणलेल्या असतात. सोनेरी जरीच्या कामात उठून दिसणारे हे 'गजराज' साडीला एक वेगळाच शाही, सुंदर आणि रॉयल लूक देतात. सोनसळी जरीतील गजराज डिझाइन पूजा आणि धार्मिक कार्यक्रमांसाठी अतिशय शुभ मानले जाते.
केवळ पदरच नाही, तर साडीच्या संपूर्ण काठावर (Border) हत्तींची एक रांग किंवा विशेष नक्षी असते. काही साड्यांमध्ये मोर आणि हत्ती यांचे एकत्रित मिश्रणही पाहायला मिळते. यामुळे साडी नेसल्यानंतर काठ अतिशय उठावदार दिसतात.
सत्यनारायण पूजेसाठी लाल, हिरवा, पिवळा आणि जांभळा हे रंग शुभ मानले जातात. गजराज पैठणीमध्ये हे डार्क रंग आणि त्यावरची सोन्याची जरी अतिशय मोहक दिसते.
साडीच्या अंगभर लहान हत्तींच्या आकाराची बुट्टी किंवा पारंपरिक ठिपक्यांची बुट्टी असते. ही नक्षी साडीला एक भरगच्च आणि पारंपारिक लूक देते.
पदरावर एकामागोमाग एक हत्ती, कमळ, मोर किंवा वेलबुट्टीसोबत गजराज डिझाइन विणलेले असते, जे फोटोमध्ये खूपच उठून दिसते.
या साडीत वरच्या आणि खालच्या दोन्ही काठावर हत्तीचे नक्षीकाम असते. नववधूसाठी ही पैठणी राजेशाही आणि पारंपरिक लुक देते.
ज्यांना साधी पण एलिगंट पैठणी हवी असते त्यांच्यासाठी हा प्रकार योग्य ठरतो. हलक्याशा काठावर छोटे गजराज मोटिफ्स आणि साधा पदर अशी रचना असते.
अनेक गजराज पैठणीच्या पदरावर केवळ हत्ती नसून अंबारीमध्ये बसलेले राजे किंवा देवतांचे चित्र असते. हे डिझाइन अत्यंत पारंपरिक आणि भव्यदिव्य दिसते.
साडीच्या रंगाचाच किंवा काठांच्या रंगाचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज शिवून हातावर हत्तीची छोटी नक्षी करून घ्या.
पूजेच्या वेळी गजराज पैठणीसोबत कोल्हापुरी साज, चिंचपेटी आणि नाकात नथ घातली की नववधूचा लुक पूर्ण होतो. हत्तीची नक्षी असलेल्या या साडीवर टेम्पल ज्वेलरी (Temple Jewellery) देखील अतिशय सुंदर दिसते.