उन्हाळ्यात पायांवर टॅनिंगचे पॅच दिसतात? निवडा ३ आकर्षक फुटवेअर्स - टॅनिंग होणार नाही, दिसा स्टायलिश...
Updated:May 4, 2025 09:50 IST2025-05-04T09:45:00+5:302025-05-04T09:50:01+5:30
Best Footwear Designs To Prevent Tanning In Summer : Footwear For Summer : Top Summer 2025 Shoe Trends : उन्हाळ्यात पायांवर टॅनिंग होऊन रंग बदलतो, सन टॅनचे पॅच दिसू नयेत म्हणून खास पॅटर्नचे फुटवेअर्स...

उन्हाळ्यात स्किन टॅनिंगची समस्या सर्वात जास्त सतावते. वाढती उष्णता आणि गरमीमुळे (Top Summer 2025 Shoe Trends) आपले हात, पाय, चेहरा सगळ्यात जास्त टॅन होतात. उन्हाळ्यात कित्येकदा आपल्या पायांचे खूप जास्त टॅनिंग होते. काहीवेळा तर अगदी पाय काळेकुट्ट होतात.
आपण पायांत ज्या प्रकारच्या चपला घालतो त्या चपलांनी (Footwear For Summer) आपल्या पायांचा जितका भाग झाकून जातो तितक्या भागाचा रंग आहे तसाच राहतो. बाकीच्या (Best Footwear Designs To Prevent Tanning In Summer) भागाचा रंग बदलून टॅनिंगमुळे काळा होतो.
उन्हाळ्यात पायांचे टॅनिंग होऊ नये म्हणून आपण योग्य फुटवेअर्सची निवड करू शकतो. पायांतील फुटवेअर्स योग्य निवड केल्यास पाय टॅनिंग होण्याची समस्याच येणार नाही.
न्हाळ्यात शक्यतो अशा पॅटर्नच्या फुटवेअर्सची निवड करावी की ज्यात, पायांचा जास्तीत जास्त भाग झाकला जाईल. यासाठीच, उन्हाळ्यात कोणत्या पॅटर्नचे फुटवेअर्स वापरावेत ते पाहूयात.
१. ग्लॅडिएटर फुटवेअर्स :-
उन्हाळ्यात पायांच्या त्वचेचे टॅनिंग होऊ नये म्हणून तुम्ही ग्लॅडिएटर पॅटर्नच्या फुटवेअर्सची निवड करू शकता. या प्रकारच्या पॅटर्नमध्ये पायांचा भाग संपूर्णपणे झाकला जाईल अशा लहान लहान पट्ट्यांचे डिझाइन्स असतात. यामुळे तुम्हाला स्टायलिश लूक तर मिळेलच सोबतच तुमच्या पायांच्या त्वचेचे टॅनिंग देखील होणार नाही. ५०० ते ८०० रुपयांपर्यंत तुम्ही अशा प्रकारचे ग्लॅडिएटर फुटवेअर्स अगदी सहजपणे विकत घेऊ शकता.
२. फ्लॅट बेली :-
फ्लॅट बेली प्रकारातील हे फुटवेअर्स उन्हाळ्यात तुमच्या पायांना टॅनिंग होण्यापासून वाचवू शकतात. या फुटवेअर्ससोबतच तुम्ही पायांना संपूर्णपणे झाकून घेण्यासाठी सॉक्स देखील घालू शकता. अशा प्रकारच्या फुटवेअर्सची सध्या तरुणींमध्ये फार मोठी क्रेझ असल्याचे पाहायला मिळते. फुटवेअर्सचा हा प्रकार ट्रेंडिंग आहे. साडीपासून जीन्सपर्यंत अगदी कोणत्याही आऊटफिटवर हे फ्लॅट बेली अगदी परफेक्ट मॅच होतात. ३०० ते ६०० रुपयांपर्यंत तुम्ही अशा प्रकारचे वेगवेगळ्या पॅटर्न्स आणि डिझाइन्सचे फुटवेअर्स विकत घेऊ शकता.
३. लूफर फॉर वुमन :-
स्त्री किंवा पुरुष दोघेही अशा प्रकारचे फुटवेअर्स घालू शकतात. उन्हाळ्याच्या ऋतूसाठी पाय टॅनिंग होऊ नये म्हणून लूफर हा सर्वात बेस्ट ऑप्शन ठरू शकतो. जर तुम्हाला वेस्टर्न किंवा स्टायलिश लूक हवा असेल तर तुम्ही अशा प्रकारचे लूफर पायांत घालू शकता. लूफर तुम्ही अगदी ऑफिसपासून नाईट पार्टीमध्ये देखील घालू शकता. लूफर फुटवेअर्स घातल्याने तुमचे पाय संपूर्णपणे झाकले जातात यामुळे पायांची त्वचा टॅनिंग होण्याचा प्रश्नच येणार नाही. ६०० ते १५०० रुपयांपर्यंत तुम्ही अशा प्रकारचे वेगवेगळ्या पॅटर्न्स आणि डिझाइन्सचे फुटवेअर्स विकत घेऊ शकता.