Join us   

दिवाळीसाठी लेटेस्ट फॅशनचं ब्लाऊज शिवायचंय? बघा मागच्या गळ्याचे ६ सुपरट्रेण्डी- स्टायलिश डिझाईन्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2023 4:31 PM

1 / 8
१. दिवाळी आता अवघ्या काही दिवसांवर आली आहे. त्यामुळे अनेकींची साडी खरेदी सुरू आहे किंवा काही जणींची खरेदी झाली पण आहे. कारण साडी घेतल्यावर तिच्यावरचं ब्लाऊज शिवायला टाकणं आणि ते वेळेत मिळणं हा मोठा टास्क असतो.
2 / 8
२. यंदा दिवाळीसाठी लेटेस्ट फॅशनचं ब्लाऊज डिझाईन शोधत असाल किंवा यावर्षी काय ट्रेण्डिंग आहे, हे पाहात असाल तर हे काही ब्लाऊज डिझाईन्स एकदा बघून घ्या. एकापेक्षा एक स्टायलिश डिझाईन्स आहेत. त्यामुळे चारचौघांत तुम्ही उठून दिसाल हे नक्की.
3 / 8
३. मागच्या गळ्याला दोरी असणं आणि त्याला लटकन असणं हे कॉमन आहे. पण आता लटकनच्या ऐवजी असं खास डिझाईन करून मिळत आहे. या फुलांच्या ऐवजी तुम्ही इतर तुमच्या आवडीचं डिझाईनही देऊ शकता.
4 / 8
४. मागचा गळा गोल किंवा चौकोनी किंवा तुम्हाला जसा पाहिजे तसा ठेवून तुम्ही त्याच्या भोवती अशा प्रकारचं आवडेल तसं बॉर्डरिंग करून घेऊ शकता.
5 / 8
५. हल्ली अशा प्रकारचं ब्लाऊजही खूप पाहायला मिळतं. हे गळ्याचं जे पॅचवर्क आहे, तशा प्रकारचे वेगवेगळ्या डिझाईन्सचे अनेक कपडे बाजारात मिळतात. तुमच्या साडीचं, काठांचं डिझाईन् कसं आहे ते पाहा आणि तशा पद्धतीचा कपडा विकत घेऊन ब्लाऊजला त्याचं पॅचवर्क करा.
6 / 8
६. हे डिझाईन सध्या सगळ्यात जास्त ट्रेण्डिंग- लेटेस्ट आहे. साडीच्याच कपड्याचं डिझाईन तुम्ही लावू शकता किंवा मग अशी एखादी लेस विकत आणूनही लावू शकता. काठपदर साडी किंवा डिझायनर साडी अशा कोणत्याही साडीवर हा प्रकार शोभून दिसेल.
7 / 8
७. त्याच प्रकारातलं हे आणखी एक डिझाईन बघा. या मधल्या लेसवर तुम्ही तुम्हाला पाहिजे ती नक्षी करून घेऊ शकता.
8 / 8
८. अशा पद्धतीचं डिझाईन आवडतंय का पाहा. एक लेस लावून त्याला छान नाजूक लटकन लावू शकता.
टॅग्स : फॅशनसाडी नेसणेदिवाळी 2022खरेदी