कपाटातल्या जुन्या काठपदराच्या साडीचे पाहा १० घेरदार ड्रेस, साडीचा ड्रेस सांगून खरं वाटणार नाही..
Updated:February 17, 2026 16:13 IST2026-02-16T19:45:19+5:302026-02-17T16:13:50+5:30
Dresses From Saree : सध्या अनारकलीपेक्षा साडीच्या कापडाचे वेगवेगळे लेअर्स असलेला टायर्ड ड्रेस सध्या खूपच ट्रेंडमध्ये आहे.

जुन्या साडीचा पुर्नवापर करून आजकाल अतिशय स्टालिश आणि युनिक ड्रेसेस तयार केले जात आहे. केवळ काठ पदर न वापरता काही नवीन आयडीया वापरून तुम्ही तुमचे व्यक्तीमत्व खुलवू शकता. (10 Ideas Of Dresses From Old Saree)
सध्या फॅशनमध्ये असलेले को आर्ड सेट्स जुन्या सिल्क किंवा कॉटन साड्यांचा वापर करून तुम्हाला तयार करता येतील.
साडीच्या एकाच कापडापासून तयार केलेल शर्ट आणि पँट किंवा टॉप आणि स्कर्ट अत्यंत अधुनिक दिसतात.
जर साडीचे कापड मऊ किंवा जॉर्जेट असेल तर त्यापासून फ्लोई काफ्तान किंवा लांब फ्रॉक तयार करता येतो. हे इंडो वेस्टर्न लूकसाठी परफेक्ट ठरतात.
साडीचे काठ किंवा फाटलेल्या साडीचे चांगले भाग जोडून बोहो स्टाईल जॅकेट बनवता येतात.
साडीच्या लांबीच्या फायदा घेऊन फ्लोर लेंथ श्रग तयार करा. जीन्स आणि टॉपवर अशा श्रग असा घातल्यास साध्या पेहरावालाही रॉयल लूक मिळतो.
सध्या अनारकलीपेक्षा साडीच्या कापडाचे वेगवेगळे लेअर्स असलेला टायर्ड ड्रेस सध्या खूपच ट्रेंडमध्ये आहे.
साडीच्या कापडापासून धोती पँट किंवा सिगारेट पँट शिवून त्यावर कॉन्ट्रास्ट रंगाचा क्रॉप टॉप घातल्यास तो एक मॉडर्न फ्युजन ड्रेस तयार होतो.
लग्नकार्याला जाण्यासाठी तसंच घरात पुजा किंवा कोणताही कार्यक्रम असल्यास हे ड्रेसेस उत्तम लूक देतात.
तुम्हाला जॅकेटसारखा लूक हवा असेल तर तुम्ही साडीच्या जॅकेटलाच जोडून सुंदर श्रग तयार करू शकता.