Diwali : महागडी साडी तर घेतली पण ब्लाऊजसाठी फॅशनेबल गळा शिवायचाय? ७ प्रकार-नवेकोरे फॅशनेबल पॅटर्न... Published:October 24, 2024 07:54 PM 2024-10-24T19:54:00+5:30 2024-10-24T20:27:04+5:30
Blouse Front Neck Design : Diwali Festival Blouse Designs And Patterns : Attractive Blouse Designs You Should Check Out This Diwali : Must-Have Saree Blouse Designs to Slay This Diwali : Diwali Festival Saree Blouse Designs नव्या फॅशनेबल पद्धतीचं शिवा ब्लाऊज, पाहा लेटेस्ट गळ्याचे लेटेस्ट पॅटर्न दिवाळीनिमित्त बऱ्याचजणी साड्यांची खरेदी करतात. या नवीन घेतलेल्या साड्यांवर लेटेस्ट आणि वेगवेगळ्या ट्रेंडी डिझाइन्सचे ब्लाऊज शिवायला अनेकींना आवडते. पण नेमकं ब्लाऊज शिवायला देताना नेकपॅटर्न कसा द्यावा असा प्रश्न आपल्याला पडतो. यासाठीच यंदाच्या दिवाळीत जर तुम्ही देखील नवीन ब्लाऊज शिवणार असाल तर हे वेगवेगळ्या प्रकारचे हटके ट्रेंडी पॅटर्न एकदा नक्की ट्राय करुन पाहाच. या ट्रेंडी आणि हटके नेकलाईन पॅटर्नमुळे तुम्ही आणि तुमचा लूक अगदी चारचौघीत उठून दिसेल.
१. स्वीटहार्ट नेकलाईन :-
अशा पद्धतीच्या स्वीटहार्ट नेक (sweatheart neck) ब्लाऊजची सध्या खूप फॅशन आहे. स्वीटहार्ट नेक आणि त्याला फुग्यांच्या बाह्या असा लूकही तुम्ही डिझायनर साडीवर कॅरी करू शकता.
२. राऊंड नेकलाईन :-
बहुतेकवेळा आपण सगळ्या ब्लाऊजना अशा कॉमन पद्धतीचा राऊंड नेकलाईन गळा शिवणे पसंत करतो. हे गळ्याचे पॅटर्न अगदी जुने आणि कॉमन असले तरीही ते तितकेच ट्रेंडी आहे.
३. कोरसेट नेकलाईन :-
सध्या हो कोरसेट नेकलाईन ब्लाऊज (corset blouse) खूप ट्रेण्डमध्ये आहे. या डिझाईनमध्ये बाह्यांचा जागी नुसता बेल्टच असला तरीही तुम्ही त्याऐवजी तुमच्या नेहमीच्या पद्धतीने शोल्डर आणि बाह्या शिवून घेऊ शकता.
४. कॉलर नेकलाईन :-
या कॉलर नेकलाईन पॅटर्नमध्ये ब्लाऊजच्या अगदी गळ्याभोवती कॉलर असते. या कॉलरला आपण वेगवेगळ्या पद्धतीने टिकल्या, कुंदन किंवा लेस लावून सजवू शकतो. यामुळे तुमच्या ब्लाऊजचा लूक एकदम ट्रेंडी आणि हटके दिसतो.
५. स्क्वेअर नेकलाईन :-
स्क्वेअर नेक (square neck) या प्रकारातलाच हा लेटेस्ट पॅटर्न बघा. तरुणींना अशा पद्धतीचे ब्लाऊज छान दिसते.
६. व्ही नेकलाईन :-
व्ही नेकलाईन (V neckline blouse) असणारं ब्लाऊजही हल्ली खूप जणी शिवतात. भरगच्च डिझाईन असणारी साडी आणि प्लेन ब्लाऊज असा पॅटर्न असेल तर हे डिझाईन छान दिसतं.
७. ज्वेल नेकलाईन :-
ज्वेल नेकलाईन या पॅटर्नमध्ये ब्लाऊजच्या गळ्याभोवती अशी पारदर्शक नेट लावली जाते. ज्याने नेकलाईन अधिकच सुंदर दिसते आणि यामुळे ब्लाऊजला एक वेगळाच नवीन लूक मिळतो.
८. नोटेचेड नेकलाईन :-
या प्रकारामध्ये ब्लाऊजला एखाद्या शर्टसारखी कॉलर असते. तसेच हा ब्लाऊज आपल्या नेहमीच्या ब्लाऊजपेक्षा उंचीला थोडा लांब असते. हा ब्लाऊज देखील तुमच्या हेव्ही डिझायनर साड्यांना एकदम कुल लूक देतो.