साडी एकच पण ड्रेपिंगच्या पद्धती वेगळ्या! दिवाळीत मिरवा हटके स्टाईल, लुक सुंदर...
Updated:October 18, 2025 17:25 IST2025-10-18T17:11:22+5:302025-10-18T17:25:49+5:30
different styles of saree draping : saree draping styles for festival : modern saree draping ideas : यंदाच्या दिवाळीत तुमचा साडी लूक अधिक आकर्षक आणि सुंदर करायचा असेल तर पाहा खास ड्रेपिंगच्या ८ पद्धती...

दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव, आनंदाचा आणि उत्साहाचा सण. या सणासुदीच्या (modern saree draping ideas) दिवसांत आपल्यापैकी बऱ्याचजणी साडी नेसण्यालाच पसंती देतात. पण दरवेळी तीच साडी त्याच पद्धतीने नेसल्याने लूकमध्ये नवीनपणा जाणवत नाही. मग या दिवाळीत थोडं वेगळं काहीतरी करुन बघायचं असेल तर, साडी नेसण्याच्या काही खास आणि क्रिएटिव्ह ड्रेपिंग स्टाईल्स वापरून तुम्ही प्रत्येक सणाच्या दिवशी एकदम हटके दिसू शकता.
साडी नेसण्याच्या ७ अशा खास आणि ट्रेंडी पद्धती आहेत, ज्या तुमच्या पारंपरिक (different styles of saree draping) लूकला ग्लॅमरस व मॉडर्न टच देतील.
१. बेल्ट स्टाईल ड्रेप (Belt Style Drape) :-
बेल्ट लावल्याने साडीला फिक्स होल्ड मिळतो आणि कमरेचा शेप देखील अगदी व्यवस्थित ठळकपणे दिसतो. यासाठी आपण डिझायनर किंवा लेदरच्या बेल्टचा वापर करु शकता. हा लूक पार्टीज आणि ऑफिस फंक्शनसाठी अगदी परफेक्ट आहे. यासोबतच, साडीला बेल्ट लावल्याने एक हटके लूक तर मिळतोच शिवाय साडी सुटण्याचे टेंन्शन देखील रहात नाही, आणि साडीत चालणे किंवा कॅरी करणे सोपे जाते.
२. धोती स्टाईल ड्रेप (Dhoti Style Drape) :-
धोती स्टाईल ड्रेपिंग आजकालच्या मॉडर्न व हटके लूकसाठी खूप लोकप्रिय आहे. धोती स्टाईल साडी ड्रेपिंग साठी तुम्ही लेगिंग्ज किंवा फिटेड पँट घाला आणि साडीला धोतीप्रमाणे प्लिट करून ड्रेप करा. हा लूक फ्युजन फॅशनचे उत्तम उदाहरण आहे.
३. पँट स्टाईल साडी (Pant Style Drape) :-
साडीला पँट किंवा ट्राऊझर घालून मग त्यावर नेसा आणि पदर पुढून किंवा मागून काढा. ही स्टाईल साधी असली तरी खूप स्टायलिश दिसते.
४. फ्रंट पल्लू ड्रेप (Front Pallu Drape ) :-
या पद्धतीत पदर पुढून काढला जातो, ज्यामुळे साडीचा काठ आणि डिझाईन ठळकपणे हायलाईट होते. कोणताही पारंपरिक कार्यक्रम किंवा सणावारासाठी ही स्टाईल खूप सुंदर दिसते.
५. स्कर्ट स्टाईल ड्रेप (Skirt Style Drape) :-
या ड्रेपमध्ये साडी स्कर्टसारखी नेसली जाते आणि पदर मोकळा सोडला जातो. हा लूक लेहंग्यासारखा दिसतो आणि दिवाळीतील पाडवा, भाऊबीज यांसारख्या सणाला तुमचा तूप अधिक खास दिसतो.
६. केप स्टाईल ड्रेप (Cape Style Drape) :-
केप हा एक जॅकेट सारखाच प्रकार असतो. यात नेट किंवा ट्रान्सपरंट केप साडीवर घाला आणि पदर साधा ठेवा. ही स्टाईल राजेशाही आणि ग्रेसफुल दिसते.
७. रफल साडी ड्रेप (Ruffle Saree Drape) :-
जर तुमच्या साडीला फ्रिल किंवा रफल असतील, तर पदर मोकळा सोडा, ज्यामुळे त्याचा फ्लेअर अधिक उठून दिसेल. हा लूक खूप आकर्षक आणि ट्रेंडी दिसतो.
८. जॅकेट स्टाईल ड्रेप (Jacket Style Drape) :-
ब्लाऊजच्या जागी शॉर्ट किंवा लॉंग जॅकेट घाला आणि पदर बाजूने पिनअप करा. हा लूक फॉर्मल आणि एथनिक लूक दिसतो.