जुन्या डिझायनर साडीपासून शिवा वेस्टर्न लूक देणारा पार्टीवेअर वनपीस! ७ लेटेस्ट पॅटर्न्स- दिसाल सगळ्यात सुंदर
Updated:November 25, 2025 12:32 IST2025-11-25T12:24:19+5:302025-11-25T12:32:12+5:30

घरात जर जुन्या डिझायनर साड्या पडून असतील आणि आता त्या नेसण्याचा कंटाळा येत असेल पण टाकूनही द्याव्या वाटत नसतील तर त्यांच्यापासून तुम्ही असे काही सुंदर वन पीस शिवू शकता...
हे वनपीस अगदी बाजारात विकत मिळणाऱ्या डिझायनर पार्टीवेअर आऊटफिट्ससारखाच आकर्षक लूक देतात..
असे कित्येक प्रकारचे नवनविन स्टाईलचे वनपीस तुम्ही जुन्या नेटच्या, शिफॉन साड्यांपासून शिवू शकता.
डिझायनर साड्यांचा पदर हेवी असतो. त्यांच्यापासून असा ड्रेसचा वरचा भाग आणि बाकीच्या साडीचा असा मोठा घेर अशा पद्धतीचा गाऊनही आकर्षक लूक देताे.
एखादी टिकलीवर्क, मोतीवर्क असणारी साडी असेल तर तिच्यापासून असा सुंदर, ट्रेण्डी गाऊन शिवता येईल.
अगदी लाईटवेट डिझायनर साडी असेल तर तिचा वापर करून असा ड्रेस शिवता येईल. ऑर्गेंझा, क्रेप, शिफॉन अशा साड्या यासाठी छान दिसतील.
असा ड्रेस घालून जर तुम्ही एखाद्या पार्टीला गेलात तर हा ड्रेस जुन्या साडीपासून शिवून घेतलेला आहे, हे सांगूनही कोणाच्या लक्षात येणार नाही.