कपड्यांनुसार ठरवा कोणती ब्रेसियर घालायची, दिसाल सुडौल! बिनधास्त चाला-धावा- उड्या मारा
Updated:June 24, 2025 17:54 IST2025-06-24T17:49:00+5:302025-06-24T17:54:41+5:30
Decide which bra to wear according to your clothes, you will look shapely! Walk, run, jump without restraint : योग्य ब्रेसियर घातल्यावर कोणतीही कृती आरामात करता येते. पाहा कोणत्या ड्रेसमधे काय पॅटर्न घालावा.

महिलांसाठी फारच महत्त्वाचे कपडे कोणते? असे विचारल्यावर त्यांनी जरी उत्तर साडी, कुर्ते असे दिले तरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ब्रेसियरच आहे. त्याशिवाय घराबाहेर पडू शकत नाही. तसेच घरातही घालावीच लागते.
अगदी रोजच्या वापराची गोष्ट आहे. जर चुकीची ब्रा घातली असेल तर दिवसभर ते छातीजवळ जाणवते. कम्फर्टेबल राहता येत नाही. ब्रेसियरमध्ये काही प्रकार असतात. कपड्यांच्या पॅटर्ननुसार ब्रेसियरचा प्रकारही बदलावा. कपडे जास्त व्यवस्थित बसतात.
रोजच्या वापरासाठी महिलांनी 'टी शर्ट ब्रा' किंवा 'स्पोर्ट्स ब्रा' वापरावी. अगदी मऊ असते. तसेच छातीवर जोर येत नाही. चालताना छातीचा भाग जास्त हलतही नाही. त्यामुळे फार आरामदायी असा हा प्रकार आहे.
कधी वेस्टर्न ड्रेस घालायचा असेल तर त्यासाठी पुश-अप ब्रा नक्की वापरुन पाहा. शरीर अगदी सुबक आणि छान दिसते. मात्र अशी ब्रा रोजच्या वापरासाठी चांगली नाही. ती घट्ट बसते. त्यामुळे दिसते छान मात्र रोज वापरु नका.
'स्ट्रॅपलेस ब्रा' आजकाल मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. ब्रेसियरला पट्टे नसतात. त्यामुळे ऑफ शोल्डर ड्रेसमधे घालण्यासाठी हा प्रकार अगदी योग्य आहे. वापरायला सोपी आहे. फक्त योग्य मापाची विकत घ्या.
आजकाल साडीवर विविध प्रकारचे ब्लाऊज वापरले जातात. त्यात घालायला, ओपन बॅकसाठी बॅकलेस ब्रा मिळते. त्याला पाठीचा पट्टा नसतो. त्यामुळे ब्लाऊजमधून पट्टा दिसत नाही. समोरुन पट्टा असतो.
छातीचा आकार मोठा असेल तर रोजच्या वापरासाठी फुल कव्हरेज ब्रा वापरा. सगळ्या बाजूंनी छाती झाकली जाते आणि व्यवस्थित दिसते. चालताना बोलताना काही लक्ष द्यावे लागत नाही.
काही महिलांना जास्त मोठा आकार असल्यामुळे आवडीचे कपडे घालण्यात संकोच वाटतो. त्यांनी 'मिनीमायझर ब्रा' वापरावी. आकार त्यातून लहान दिसतो आणि त्रासही होत नाही.
घरात वापरण्यासाठी 'ब्रालेट' हा प्रकार अगदी योग्य आहे. ही ब्रा पातळ असते. सैल बसते आणि आरामदायी आहे. त्याला पायपिंग किंवा पॅड नसते. मात्र त्यातून काहीही दिसत नाही. शिवाय कापड कॉटनचे असल्याने रॅशही उठत नाही.