साधी साडी- लूक रॉयल! कस्टमाइज्ड स्टोन वर्क ब्लाऊजचे एकापेक्षा एक भारी पॅटर्न
Updated:February 11, 2026 10:09 IST2026-02-10T20:00:00+5:302026-02-11T10:09:07+5:30
Stone work blouse designs: Customized blouse designs: Designer blouse patterns: मागच्या गळ्यावरील स्टोन वर्कचे विविध प्रकार

साडी कितीही साधी असली तरी तिला आपण हेवी लूक देऊ शकतो. आपल्या प्रत्येकाच्या कपाटात एक तरी अशी साडी असते जी दिसायला सुंदर असली तरी साधी असते. कधी प्लेन शिफॉनची कर कधी सिल्कची. पण या साडीला रॉयल लूक द्यायचा असेल ब्लाऊजला कस्टमाइज्ड स्टोन वर्क करा.(Stone work blouse designs)
सध्या पाठीमागच्या गळ्यावर जड आणि नाजूक स्टोन वर्क करण्याची मोठी क्रेझ आहे.ज्यामुळे आपल्याला रॉयल लूक मिळतो. पाहूया मागच्या गळ्यावरील स्टोन वर्कचे विविध प्रकार (Customized blouse designs)
आपल्याला खूप जास्त भरगच्च डिझाइन नको असेल तर ब्लाऊजच्या मागच्या गळ्याच्या काठाने जाड स्टोन लावा. यात पांढरे किंवा साडीच्या रंगाचे खडे वापरता येतील.
आपण ब्लॅक रंगाच्या साडीचे मागच्या गळ्याचे ब्लाऊज चौकोनी आकारात शिवू शकतो. त्याला बाजूने लेस लावून मध्यभागी स्टोन वर्क करता येईल.
आपली नेटची साडी एम्ब्ररॉयडरीने वर्क केलेली असेल तर मागच्या गळ्याचे ब्लाऊज साधे शिवा. त्यावर एखादा स्टोन आणि मोत्याचे लटकन लावून सुंदर करता येईल.
साडी प्रिटेंड असेल तर फ्रिल किंवा लेयरर्ड ब्लाऊज शिवा. मागच्या गळ्याला आपण स्टोनने वर्क करु शकतो. त्यात मोती आणि नॉर्टने त्यात भर घालता येईल.
साडीवर फुलांची नक्षी असेल तर आपण लांब बाह्यांचे ब्लाऊज शिवू शकतो. बाह्यांवर छोट्या स्टोनने डिझाइन करता येईल. आणि मागच्या गळ्यावर मोठ्या फुलांचा पॅचवर्क करता येईल. तर स्टोनवर्क व मोत्याचे लटकन उठून दिसेल.
ब्लाउजच्या मध्यभागी स्टोन्सचा वापर करून मोर, कमळ किंवा वेलींची डिझाइन कस्टमाइज करून घेता येते. हे वर्क दिसायला अतिशय रिच वाटते. विशेषतः गडद रंगाच्या ब्लाउजवर सोनेरी खडे उठून दिसतात.
प्लेन साडीला फुलापाखरु आणि बॉर्डर वर्क असेल तर फ्रील ब्लाऊज शिवा. मागच्या गळ्याला फुलपाखराचे डिझाइन्स काढून आपण त्यावर मोत्याचे वर्क करु शकतो.
शिफॉनची साडी आणि छोटी बॉर्डर असेल तर फुग्याचे ब्लाऊज शिवा. मागचा गळा चौकोनी आकारत शिवून त्यावर फुलांचे पॅचेस लावा. त्यावर मोत्याचे आणि स्टोनचे वर्क करता येईल.