कॉटनची साडी नेसताना फुगते- निऱ्या घालताना त्रास? ५ टिप्स - १५ मिनिटांत नेसा कॉटनची साडी चापूनचोपून
Updated:October 17, 2025 12:52 IST2025-10-05T16:34:52+5:302025-10-17T12:52:58+5:30
how to drape cotton saree perfectly: cotton saree draping tips: how to avoid puffiness in cotton saree : कॉटनची साडी फुगू नये म्हणून नेमकं काय करावं?

सणासुदीच्या काळात ऑफिस वेअरसाठी आपल्याला नटून-थटून जायचं असतं. त्यासाठी कॉटनची साडी ही बेस्ट असते. कॉटनची साडी म्हणजे प्रत्येक स्त्रीच्या वॉर्डरोबमधला क्लासिक भाग. हलकी, आरामदायी आणि सुंदर दिसणारी ही साडी रोजच्या वापरासाठी योग्य असली तरी नेसताना फुगते, धुतल्यानंतर आकसते. ज्यामुळे त्याचा रंग खराब होतो. (how to drape cotton saree perfectly)
कितीही काळजीपूर्वक धुतली, वाळवली किंवा इस्त्री केली तरी साडी नेहमीच नव्यासारखी राहात नाही. मग प्रश्न पडतो कॉटनची साडी फुगू नये म्हणून नेमकं काय करावं? (cotton saree draping tips)
कॉटनची साडी धुतल्यानंतर ती बर्फाच्या थंड पाण्यात ५ मिनिटे भिजवा. यामुळे धागे घट्ट होतात आणि फुगण्याची शक्यता कमी होते.
साडी धुतल्यानंतर पाण्यात एक कप तांदळाचे पाणी घाला. हे नैसर्गिक स्टार्चप्रमाणे काम करतं. आणि साडीला हलका स्टिफनेस देतं. बाजारात मिळणाऱ्या स्टार्चपेक्षा हे चांगलं असतं.
गुलाबपाणी साडीला हलका सुगंध तर देतंच पण त्यात असलेले नैसर्गिक घटक धाग्यांमध्ये ओलावा ठेवतात. ज्यामुळे साडी आकसत नाही किंवा फुगत नाही.
कॉटनच्या साडीला इस्त्री करताना ती उलटी करुन इस्त्री करा. उष्णतेमुळे साडीचे धागे सैल होतात. साडी उलटी करुन इस्त्री केली तर धाग्यांवरचा ताण कमी होतो आणि साडी फुगत नाही.