जिम न लावता मिळेल 'झिरो फिगर' ! बेली फॅट लपवण्यासाठी ५ ट्रेंडी कॉर्सेट ब्लाउज; साडीत दिसाल सडपातळ
Updated:March 24, 2026 17:54 IST2026-03-23T20:00:00+5:302026-03-24T17:54:01+5:30
Saree styling tips for hourglass figure: Indo-western corset blouse trends 2026: झिरो फिगर किंवा Hourglass लूक हवा असेल तर बेली फॅट लपवण्यासाठी ट्राय करा ५ ट्रेंडी कॉर्सेट ब्लाऊज.

अनेक महिलांना साडी नेसताना एका गोष्टीची मोठी काळजी वाटते ती म्हणजे बेली फॅट किंवा वाढलेला पोटाचा घेर. साडी नेसल्यानंतर कंबरेच्या भागातून पोटे थोडे जरी बाहेर दिसले तर पूर्ण लूक खराब झाल्यासारखा वाटतो. यासाठी अनेकदा शेपवेअरचा वापर केला जातो. पण तो तासनतास घालणं खरंतर कठीण. या समस्येवर सध्याचा सर्वात ट्रेंडी आणि फॅशनेबल उपाय म्हणजे कॉर्सेट ब्लाऊज. (Saree styling tips for hourglass figure)
कॉर्सेट ब्लाऊज फक्त दिसायला नाहीत, तर आपल्या शरीराला विशिष्ट प्रकारचा आकार देतात. जर आपल्याला झिरो फिगर किंवा Hourglass लूक हवा असेल तर बेली फॅट लपवण्यासाठी ट्राय करा ५ ट्रेंडी कॉर्सेट ब्लाऊज.(Indo-western corset blouse trends 2026)
लाँग लाईन कॉर्सेट ब्लाऊज नेहमीच्या ब्लाऊजच्या लांबीला थोडा जास्त असतो. तो आपल्या बरगड्यांपासून पोटाच्या खालच्या भागापर्यंत कव्हर करतो. यामध्ये आपल्या पोटाची चरबी सहसा दिसत नाही.
पेप्लम स्टाईल कॉर्सेट ब्लाऊजमध्ये थोडा फ्लेअर किंवा घोळ असतो. आपल्याला लोअर बेली फॅटची समस्या असेल, तर पेप्लमचा घोळ तो भाग पूर्णपणे झाकून टाकतो. हा ब्लाऊज सिल्क किंवा ऑर्गन्झा साडीवर अत्यंत रॉयल दिसतो.
व्ही-कट हेमलाईन कॉर्सेट ब्लाऊजचा खालचा भाग व्ही शेप आकारात असतो. या लूकमुळे आपण सगळ्यांच्या नजरेचा केंद्रबिंदु ठरतो. कंबर अधिक बारीक असल्याचा भास होतो. साध्या साडीवर हे डिझाइन सुंदर दिसते.
बोनड स्ट्रक्चर कॉर्सेट ब्लाऊजमध्ये पाठीचे हाड ताठ राहते आणि पोटाचा भाग आत दबलेला असतो. हे ब्रायडल वेअरसाठी चांगला पर्याय आहे.
बेल्टेड कॉर्सेट ब्लाऊज डिझाइनमध्ये मॅचिंग बेल्टचा वापर केला जातो. बेल्टमुळे आपल्या कंबरेला वेगळा आकार मिळतो. त्यामुळे साडीचा पदरही नीट राहतो आणि आपली फिगर Hourglass सारखी दिसते.