ब्लाऊजला लावा ८ प्रकारच्या सुंदर बॅक नॉट! नॉट पॅटर्न ब्लाऊज डिझाइन्स - लूक बदलेल...
Updated:April 26, 2025 17:00 IST2025-04-26T16:24:13+5:302025-04-26T17:00:15+5:30
Classy Deep Neck Knot Blouse Designs : 10 Types of Saree Blouse Knot Designs : ब्लाऊजच्या मागच्या बाजूला वेगवेगळ्या पॅटर्नच्या नॉट लावण्याचा ट्रेंडच भारी...

ब्लाऊजची मागची बाजू जर सुंदर आणि अधिक आकर्षक (Classy Deep Neck Knot Blouse Designs) असेल तरच तो ब्लाऊज अगदी उठून दिसतो. ब्लाऊजचा बॅक चांगला दिसावा यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे गळे किंवा लटकन लावून अशा वेगवेगळ्या पॅटर्नचे ब्लाऊज शिवून घेतो.
ब्लाऊजच्या मागच्या भागाला अजून छान गेटअप येण्यासाठी तुम्ही (10 Types of Saree Blouse Knot Designs) मागच्या बाजूने वेगवेगळ्या पॅटर्नच्या नॉट शिवू शकता. ब्लाऊजच्या मागच्या बाजूने तुम्ही कोणकोणत्या पॅटर्नचे नॉट शिवू शकता ते पाहूयात.
१. तुम्ही अशाप्रकारे ब्लाऊजच्या मागच्या बाजूला लटकन लावण्याऐवजी सुंदरशी नॉट शिवून घेऊ शकता. या नॉटमुळे तुमच्या ब्लाऊजला एक वेगळाच लूक मिळेल.
२. काहीजणींना ब्लाऊजच्या मागच्या बाजूला नॉट नको असते तेव्हा तुम्ही अशा प्रकारे साडीचा काठ आडवा लावून तुमच्या ब्लाऊजला अधिक आकर्षक व नवा लूक देऊ शकता.
३. तुम्ही अशाप्रकारे डिप यू नेकचा ब्लाऊज शिवून त्याच्या खालच्या बाजूला अशी एखादी नॉट शिवून ब्लाऊजला फॅन्सी लूक देऊ शकता.
४. यू आकाराप्रमाणेच तुम्ही डिप व्ही नेक ब्लाऊज शिवून खाली अशाप्रकारे नॉट लावू शकता.
५. तुम्ही अशा प्रकारे ब्लाऊजला काँट्रास रंग असणाऱ्या किंवा साडीच्या रंगाला मॅचिंग असणारी अशी एखादी नॉट देखील शिवून ब्लाऊजला हटके लूक देऊ शकता.
६. जर तुम्हाला ब्लाऊजचा मागचा गळा फार डिप नको असल्यास, अशाप्रकारे पॅक नेक गळा शिवून त्याला त्रिकोणी कट देऊन खालच्या बाजूने एक सुंदरशी नाजूक नॉट शिवू शकता.
७. साडीचा काठ वापरुन देखील तुम्ही मागच्या बाजूच्या नॉटला अधिक जास्त सुंदर लूक देऊ शकता.
८. पार्टी वेअर साडीवरील ब्लाऊजच्या मागच्या बाजूला थोडा आकाराने मोठा असणारा असा बो शिवू शकता. यामुळे तुमच्या ब्लाऊजला पार्टी वेअर लूक मिळेल.
९. ब्लाऊजला अधिक ब्लोड आणि क्लासी लूक हवा असेल तर तुम्ही अशाप्रकारे डिप नेकचा ब्लाऊज शिवून खालच्या बाजूने नॉट लावून तो अधिक आकर्षक आणि सुंदर करु शकता.
१०. तुम्ही ब्लाऊजला अशा वेगवेगळ्या पॅटर्नच्या नॉट लावून तुमच्या नेहमीच्या साध्या ब्लाऊजला देखील नवीन ट्रेंडी लूक देऊ शकता.