कपड्यांचे ढीग नको, ‘या’ कलर कॉम्बिनेशनप्रमाणे निवडा कॉन्ट्रास्ट स्टाइल! नवा फॅशनेबल स्टायलिश ट्रेंड
Updated:May 15, 2025 17:12 IST2025-05-15T17:06:33+5:302025-05-15T17:12:22+5:30
choose a contrast style like this color combination! follow The new fashionable stylish trend : तेच तेच ड्रेस घालून कंटाळला असाल तर काही तरी वेगळं घालून पाहा. सुंदर रंगाचे हे ड्रेस दिसतात अगदी हटके.

ओढणीचा ड्रेस शक्यतो एकाच कलर पॅटर्नचा असतो. कुर्ता वेगळ्या रंगाचा पॅण्ट आणि ओढणी समान रंगाची. मात्र या पेक्षा वेगळी काही तरी फॅशन करायची असेल तर कॉन्ट्रास्ट ड्रेस नक्की ट्राय करा.
जांभळ्या रंगाची ओढणी आणि गडद हिरव्या रंगाचा ड्रेस हे कॉम्बिनेशन फेअर स्किन टोनसाठी अगदी मस्त आहे. फार सुंदर दिसते.
लाल रंग सगळेच वापरतात मात्र तांबडा रंग त्याहून सुंदर दिसतो. तांबड्या रंगाची जरीची ओढणी आणि एखाद्या फिक्या रंगाचा ड्रेस जसे की पांढरा किंवा ऑफ व्हाईट, हे कॉम्बिनेशन डेली वेअरसाठी अगदी छान आहे.
बांधणी पॅटर्नमध्ये गुलाबी रंग अगदी आरामात कुठेही मिळून जातो. बांधणीची गुलाबी ओढणी पिवळ्या रंगावर तसेच लेमन रंगावर अगदी सुंदर दिसते. एखाद्या कार्यक्रमासाठी असे कॉम्बिनेशन घालायला काहीच हरकत नाही.
त्याच त्याच रंगाचा सेम लेहेंगा घालून कंटाळा आला असेल तर आता कॉन्ट्रास्ट ओढणी असलेला एक रंगी लेहेंगा नक्की घालून पाहा. फिक्या रंगाचा ड्रेस आणि त्याच रंगातील गडद ओढणी फार सुंदर दिसते. जसे की हिरवट ड्रेस आणि नीळी गडद ओढणी एकत्र छान दिसतात.
फिकट ड्रेस आणि गडद ओढणी कॉमन आहे मात्र फिकट ओढणी आणि गडद ड्रेस फार कॉमन नाही. काळा ड्रेस आणि त्यावर गुलाबी ओढणी हा प्रकार अगदी सुंदर दिसतो.
ऑफ व्हाईट ओढणी निळ्या रंगावर तसेच जांभळ्या रंगावर हिरव्या रंगावर अगदी छान सुट होते.
लाईट पिंक आणि शेवाळी हे कॉम्बिनेशन अगदीच डिसेंट आहे. ऑफीससाठी किंवा कार्यक्रमांसाठी वापरण्यासाठी अगदी योग्य आहे.