चिकनकारी कुर्ते-ड्रेसवरील एम्ब्रॉयडरी खराब होऊ नये म्हणून ६ टिप्स, कायम कुर्ता दिसेल नवा...
Updated:May 8, 2025 19:36 IST2025-05-08T19:23:41+5:302025-05-08T19:36:06+5:30
Care and Maintenance Tips for Your Chikankari Kurtis : How to Maintain Your Embroidered Chikankari Kurtis : The Ultimate Guide To Make Your Chikankari Last Longer : Chikan Kurti Care Guide: How to Wash and Maintain : चिकनकारी कुर्ते, ड्रेसवरील एम्ब्रॉयडरी खराब होते, असे होऊ नये म्हणून खास उपाय...

आपल्यापैकी प्रत्येकीच्या कपाटांत किमान एक तरी चिकनकारी पॅटर्नचा (Care and Maintenance Tips for Your Chikankari Kurtis) ड्रेस किंवा कुर्ती असतेच. परंतु अनेकदा या चिकनकारी कपड्यांची योग्य ती काळजी न घेतल्यास ते लवकर खराब दिसू लागतात, तर काहीवेळा त्यांचे धागे देखील निघू लागतात. असे महागडे चिकनकारी पॅटर्नचे कुर्ते - ड्रेस यांची काळजी कशी घ्यावी ते पाहूयात..
१. चिकनकारी कुर्ते किंवा ड्रेस, टॉप वॉशिंग मशीनमध्ये न धुता नेहमी हातानेच धुवावेत. यासोबतच चिकनकारी कपडे धुताना सौम्य साबण किंवा डिटर्जंटचा वापर करावा. चिकनकारी कपडे नेहमी थंड पाण्यातच धुवावेत.
२. चिकनकारी पॅटर्नचे कपडे, ड्रेस धुण्यापूर्वी ते ५ ते १० मिनिटे साबणाच्या पाण्यात भिजत ठेवावेत. त्यानंतर हलक्या हाताने ते नीट धुवून घ्यावे. असे कपडे घासून किंवा चोळून धुणे टाळावे.
३. चिकनकारी पॅटर्नचे कपडे धुतल्यानंतर ते थेट सूर्यप्रकाशात वाळवू नयेत. सावलीत व्यवस्थित वाळवून घ्यावे. यासोबतच, तुम्ही एक टॉवेल पसरवून घालून मग त्यावर हे कपडे वाळत घालावेत. चुकूनही असे कपडे हँगरला लटकवू एक, यामुळे त्याचे कापड लूज पडून ते खराब होऊ शकतात.
४. चिकनकारी पॅटर्नचे कपडे इस्त्री करताना नेहमी आतील बाजू बाहेर काढून कपड्यांना इस्त्री करावी. यामुळे इस्त्रीच्या हिटमुळे चिकनकारी वर्क खराब होणार नाही तसेच ते कापड दीर्घकाळ चांगले टिकून राहील. यासोबतच त्यावरील एम्ब्रॉयडरी खराब होऊ नये म्हणून त्यावर कॉटनचा रुमाल अंथरून मगच त्यावरून इस्त्री करावी.
५. चिकनकारी कपडे कपाटांत ठेवताना त्यावरील एम्ब्रॉयडरी खराब होऊ नये म्हणून सुती कापडात घडी घालून ठेवून द्यावे.
६. कपाटांत स्टोअर करून ठेवलेले चिकनकारी पॅटर्नचे कपडे दर १० ते १५ दिवसांनी बाहेर काढून घाव्यावेत. काहीवेळासाठी हे कपडे उन्हात व्यवस्थित सुकवून घ्यावेत.
७. चिकनकारी पॅटर्नचे कपडे चुकूनही प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये भरून कपाटात स्टोअर करून ठेवू नये, यामुळे कपड्यांची चमक नाहीशी होते.