ब्लाऊजमध्ये दंड जाडजूड दिसतात? बघा बाह्यांचे ८ क्लासिक पॅटर्न - दंड स्लिम-मिळेल परफेक्ट लूक...
Updated:October 8, 2025 10:25 IST2025-10-07T20:33:19+5:302025-10-08T10:25:55+5:30
Blouse sleeves pattern for heavy arms : blouse sleeve styles to hide arm fat : जर दंड जाड दिसत असतील तर ब्लाऊजच्या बाह्यांचा कोणता पॅटर्न योग्य ठरेल? यासाठी पाहा खास डिझाईन्स...

भारतीय पारंपरिक वेशभूषेत 'ब्लाऊज' हा साडीचा अविभाज्य भाग आहे आणि (Blouse sleeves pattern for heavy arms) तो आपल्या संपूर्ण लूकला एक खास टच देतो. परंतु, आपल्यापैकी अनेकींचे दंड जाड असल्यामुळे साडीवर नेमका कोणत्या पॅटर्नचा ब्लाऊज घालावा असा प्रश्न पडतो. बाजारात उपलब्ध असलेले स्लीव्हलेस किंवा अतिशय शॉर्ट स्लीव्हचे ब्लाऊज घातल्यास दंड अधिक मोठे दिसतात, अशी अनेकींची तक्रार असते.
अनेक महिलांना साडी नेसताना एक कॉमन प्रश्न पडतो, जर हात किंवा दंड जाड दिसत (blouse sleeve styles to hide arm fat) असतील तर कोणता ब्लाऊज पॅटर्न योग्य ठरेल? चुकीचा ब्लाऊज डिझाइन निवडल्यास हात अधिक जाड दिसू शकतात, तर योग्य पॅटर्न निवडल्यास तो भाग सहजपणे लपवता येतो आणि लूक अधिक स्लिम दिसतो.
आपण असे काही खास ब्लाऊज पॅटर्न पाहूयात की जे, जाड दंड लपवण्यासोबतच, फॅशनेबल - स्टायलिश लूक देऊन शरीराला सुंदर आकार देतात.
१. किमोनो स्लीव्हज :-
किमोनो स्लिव्ह्ज या मस्त मोठ्या, ऐसपैस आणि कम्फर्टेबल असतात. किमोनो स्लिव्ह्ज पॅटर्नच्या बाह्या असणारे ब्लाऊज घातल्याने आर्म फॅट्स सहज लपवता येतात. यामुळे जाडजूड दंड पटकन हायलाईट होत नाहीत.
२. फ्लटर स्लीव्हज :-
फ्लटर स्लीव्हज म्हणजे हलक्या, थोड्याशा फ्रिल आणि पंख्यासारख्या आकाराच्या बाह्या असतात. या बाही दंडाभोवती सैलपणे कव्हर करतात आणि त्यामुळे हाताचा जाडपणा नैसर्गिकरीत्या लपतो. या स्लीव्हजचा फॅब्रिक साधारणतः जॉर्जेट, शिफॉन किंवा क्रेपसारखा हलका असतो, ज्यामुळे तो लूक अधिक एलिगंट दिसतो. दंड थोडे जाड असतील, तर फ्लटर स्लीव्ह ब्लाऊज हा परफेक्ट पर्याय आहे. अशा बाह्यांचे ब्लाऊज पॅटर्न डिझाइनर, पार्टीवेअर, फेस्टिव्ह साड्यांसोबत किंवा फ्लोरल प्रिंट साड्यांसोबत खूप सुंदर दिसते.
३. थ्री - फोर्थ स्लिव्ह्ज :-
थ्री-फोर्थ स्लीव्हज या प्रकारच्या बाह्यांमध्ये, स्लीव्हजचा शेवट मनगटाच्या थोडा वर असल्याने एक आकर्षक व्हिज्युअल इफेक्ट तयार होतो, ज्यामुळे दंड बारीक दिसतात.
४. शिअर स्लिव्हज :-
शिअर स्लिव्हज म्हणजे थोड्या पारदर्शक कापडाच्या (जसे नेट, ऑर्गेन्झा किंवा ट्युल) बनवलेल्या बाही. या बाह्यांमुळे हात झाकला जातो पण तरीही हलका, सॉफ्ट आणि स्टायलिश लूक मिळतो. ज्यांचे दंड थोडे जाड आहेत, त्यांच्यासाठी शिअर स्लीव्ह ब्लाऊज उत्तम पर्याय ठरतो कारण तो हात झाकतो त्यामुळे दंड जाडजूड वाटत नाही. शिवाय, या बाहींमध्ये हलकासा ट्रान्सपरन्सी इफेक्ट असल्याने हात स्लीम दिसतात. हा पॅटर्न फेस्टिव्ह, पार्टी किंवा रिसेप्शन साड्यांसोबत अत्यंत ग्रेसफुल दिसतो.
५. अंगोला स्लिव्हज किंवा रॅगलॅन स्लिव्हज :-
या स्लिव्हज खांद्यापासून खाली सैल होत असल्याने, त्या दंडांना जास्त चिकटून राहत नाहीत, ज्यामुळे दंड मोठे किंवा जाडजूड दिसत नाहीत.
६. एल्बो लेंथ स्लिव्हज :-
हा पॅटर्न अतिशय क्लासी आणि पारंपरिक लूक देतो. स्लिव्हजची लांबी थेट कोपऱ्यापर्यंत (Elbow) किंवा त्याहून थोडी खाली असल्याने दंडाचा जाडसर भाग पूर्णपणे झाकला जातो आणि हाताचा मनगटाकडील सडपातळ भाग दिसतो, ज्यामुळे हात सडपातळ दिसतात.
७. रफल किंवा फ्लेयर्ड स्लिव्हज :-
रफल किंवा फ्लेयर्ड स्लिव्हज या पॅटर्नच्या बाह्यांमध्ये, फॅब्रिकचा फ्लो हाताचा आकार बॅलन्स करतो ज्यामुळे दंडाची जाडी सहज लपवता येणे शक्य होते.
८. बलून स्लिव्हज :-
बलून स्लिव्हज म्हणजे खांद्यापासून खाली हलक्याशा फुगलेल्या बाह्या असतात. या स्लीव्हजचा फुगवटा हाताच्या जाडपणाला लपवून एक आकर्षक, रॉयल लूक देतो.