साडी कोणतीही असो, शोभून दिसतील असे ब्लाऊजचे ७ नेक पॅटर्न्स! प्रत्येकीकडे असायलाच हवे अशा डिझाइन्सचे ब्लाऊज...
Updated:September 24, 2025 17:16 IST2025-09-24T16:58:15+5:302025-09-24T17:16:05+5:30
common blouse neck patterns for sarees : blouse neck designs that match every saree : best blouse designs to pair with saree : blouse neck cutting styles for every saree : popular blouse neck patterns for women : ब्लाऊजचे असे काही कॉमन नेक पॅटर्न्स आहेत, जे कुठल्याही साडीसोबत तुम्हांला सुंदर लूक देतात, ते कोणते पाहा..

आपल्यापैकी प्रत्येकीच्या वॉर्डरोबमध्ये साड्यांसोबत जुळवून किंवा थोडेफार मॅच (common blouse neck patterns for sarees) करुन घालता येतील असे वेगवेगळ्या पॅटर्नचे ब्लाऊज असतात. साडी नेसल्यावर ती उत्तम दिसावी यासाठी ब्लाऊजची योग्य निवड करणे देखील तितकेच गरजेचे असते. ब्लाऊजचे डिझाइन हा केवळ फॅशनचा भाग नसून, ते आपल्याला सुंदर व आकर्षक लूक देतात.
प्रत्येकीच्या वार्डरोबमध्ये वेगवेगळ्या पॅटर्नचे ब्लाऊज असतात, पण काही असे (blouse neck designs that match every saree) कॉमन नेक डिझाइन्स आहेत, जे प्रत्येक महिलेच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
ब्लाऊजचे असे काही कॉमन नेक पॅटर्न्स आहेत, जे कुठल्याही साडीसोबत शोभून दिसतात आणि नेहमीच्या वापरासाठीही अगदी कम्फर्टेबल आणि परफेक्ट असतात. ब्लाऊजचे असे काही कॉमन नेक पॅटर्न्स आहेत जे पारंपारिक आणि वेस्टर्न अशा दोन्ही लूकसाठी शोभून दिसतात. असे कोणते ७ ब्लाऊजचे नेक पॅटर्न्स आहेत जे प्रत्येकीच्या वार्डरोबमध्ये असायलाच हवेत ते पाहूयात..
१. डीप व्ही नेक ब्लाऊज (Deep V Neck Blouse) :-
ब्लाऊजचा डीप व्ही नेक पॅटर्न मॉडर्न आणि एलिगंट लूकसाठी अगदी परफेक्ट आहे. हा गळा तुमच्या मानेला एक सुंदर आकार देतो आणि तुम्हाला स्लिम लुक मिळण्यास मदत होते. आपण प्लेन किंवा वेगवेगळ्या प्रकारचे वर्क केलेल्या साडीवर हा ब्लाऊज मॅच करुन घालू शकता.
२. बोट नेक ब्लाऊज (Boat Neck Blouse) :-
बोट नेक ब्लाऊज सध्या खूप लोकप्रिय आहे. यात गळा खांद्याच्या दिशेने पसरलेला असतो, ज्यामुळे तुम्हाला एक एलिगंट आणि क्लासिक लुक मिळतो. हा ब्लाऊज उंचीने कमी असलेल्या महिलांसाठी उत्तम पर्याय आहे.
३. कॉलर नेक ब्लाऊज (Collar Neck Blouse) :-
कॉलर असलेला ब्लाऊज एक वेगळा आणि स्टायलिश लुक देतो. हा ब्लाऊज पारंपरिक आणि मॉडर्न किंवा वेस्टर्न प्रकारच्या दोन्ही साड्यांवर चांगला दिसतो. कॉलरमुळे तुमचा लुक प्रोफेशनल आणि आकर्षक वाटतो.
४. बॅकलेस किंवा टाय - अप ब्लाऊज (Backless & tie - up Blouse) :-
बॅकलेस किंवा टाय - अप ब्लाऊज या प्रकारचे ब्लाऊज फेस्टिव्ह सिजनला मस्त बोल्ड आणि ग्लॅमरस टच देतात.
५. गोल गळ्याचा ब्लाऊज (Round Neck Blouse) :-
गोल गळ्याचा ब्लाऊज हा सर्वात सोपा आणि आकर्षक पर्याय आहे. हा प्रत्येक साडीवर शोभून दिसतो आणि तुम्हाला एक सोबर लुक देतो. हा ब्लाऊज वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी वापरला जाऊ शकतो आणि तो कधीही आऊट ऑफ फॅशन होत नाही.
६. स्वीटहार्ट नेक ब्लाऊज (Sweetheart Neck Blouse) :-
स्वीटहार्ट नेक ब्लाऊजमध्ये गळ्याचा आकार हृदयासारखा (heart-shaped) असतो. यामुळे तुम्हाला एक सुंदर आणि मोहक लुक मिळतो. हा ब्लाऊज खास प्रसंगांसाठी जसे की लग्न किंवा पार्टीसाठी अगदी परफेक्ट शोभून दिसतो.
७. बंद गळ्याचा ब्लाउज (High Neck Blouse) :-
हा ब्लाऊजचा पॅटर्न उंच गळ्याचा असतो आणि यात मानेचा भाग पूर्णपणे झाकलेला असतो. हा ब्लाऊज तुम्हाला रॉयल आणि सोफिस्टिकेटेड लुक देतो. तुम्ही तो प्लेन किंवा भरतकाम केलेल्या साडीसोबत घालू शकता.