Perfect Blouse Design for Body Type : हात आणि दंड खूप बारीक? 'असे' शिवा नव्या डिझाइन्सचे ब्लाऊज, बॉडी टाईपनुसार परफेक्ट फिटिंग
Updated:April 12, 2026 20:00 IST2026-04-12T20:00:00+5:302026-04-12T20:00:02+5:30
blouse designs according to body shape: blouse designs for saree : आपल्या बॉडी शेपनुसार ब्लाऊज कसे शिवायचे, परफेक्ट डिझाइन्स कोणती पाहूया.

साडीचे सौंदर्य हे आपल्या ब्लाऊज घालण्याच्या स्टाईलवर अवलंबून असतं. अनेकदा स्त्रियांची तक्रार असते की हात आणि दंड खूप बारीक आहेत, ज्यामुळे साडी नेसल्यावर आपल्याला परफेक्ट लूक मिळत नाही. कधी कधी दंड बारीक असल्यामुळे ब्लाऊजच्या बाह्या ढिल्या दिसतात किंवा खांदे उतरल्यासारखे वाटतात. अशा वेळी नेमकी कोणती डिझाइन निवडावी हे सगळ्यात कठीण काम. (blouse designs according to body shape)
फॅशनच्या जगात प्रत्येक शरीरयष्टीसाठी खास ट्रिक्स आहेत. जर आपले हात बारीक असतील, तर आपणही काही ठराविक कट्स आणि डिझाइन्सचा वापर करून आपल्या दंडांना थोडा भरदार लुक देऊ शकता. आपल्या बॉडी शेपनुसार ब्लाऊज कसे शिवायचे, परफेक्ट डिझाइन्स कोणती पाहूया. (blouse designs for saree)
आपली बॉडी सडपातळ असेल तर फुगीर बाह्या,उंच गळा आणि भरजरी भरतकाम केलेले ब्लाऊज निवडा. यामुळे आपल्या लुकला अधिक उठाव येतो, ज्यामुळे आपण सुंदर दिसतो. आपण डीप नेक किंवा बोट नेकचे ब्लाऊजही शिवू शकतो.
आपले वजन भरपूर असेल आणि शरीरयष्टी हेल्दी असेल तर व्ही-नेक, स्क्वेअर नेक आणि प्रिन्सेस कट ब्लाउज डिझाइनचा विचार करू शकता. यामुळे आपल्या शरीराला बॅलेन्स लुक मिळतो. ज्यांची शरीरयष्टी अधिक भरलेली आहे, त्यांनी खूप घट्ट किंवा खूप सैल ब्लाऊज घालणे टाळावे.
कमी उंचीच्या महिलांनी डीप नेक, बाही नसलेले किंवा कोपरापर्यंत बाही असलेले ब्लाऊज घालावेत. यामुळे त्या उंच दिसतात. लहान नक्षी आणि साध्या डिझाईन्स आपल्यासाठी बेस्ट आहेत.
जर आपले खांदे किंवा छातीचा भाग थोडा जाड असेल, तर व्ही-नेक, डीप यू-नेक आणि फ्लोई फॅब्रिकच्या कापडाचे ब्लाउज आपल्यासाठी उत्तम आहेत. यामुळे आपला लूक संतुलित राहील.
आपल्या शरीराचा वरचा भाग सडपातळ असेल, तर ऑफ-शोल्डर, हॉल्टर नेक किंवा रफल स्लीव्हज असलेले ब्लाउज निवडा. यामुळे आपल्या लुकला स्टाईल आणि व्हॉल्यूम दोन्ही मिळतात. डिझाइन कोणतीही असली तरी ब्लाऊजची फिटिंग सर्वात महत्त्वाची असते.