सप्तपदीसाठी नववधूचा खास साजश्रृंगार! पाहा ब्लाऊजचे १० डिझाइन्स - सांगतात दिल्याघेतल्या वचनांची गोष्ट...

Updated:March 28, 2026 18:59 IST2026-03-28T18:29:53+5:302026-03-28T18:59:11+5:30

Blouse Back Design For Saptapadi : bridal blouse back designs for wedding : लग्नात सप्तपदीच्या सात पावलांसाठी तयार होणाऱ्या 'नवरी'साठी सुंदर, ट्रेंडी 'ब्लाऊजच्या डिझाईन्स...

सप्तपदीसाठी नववधूचा खास साजश्रृंगार! पाहा ब्लाऊजचे १० डिझाइन्स - सांगतात दिल्याघेतल्या वचनांची गोष्ट...

लग्नाचा दिवस हा प्रत्येक मुलीसाठी आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा आणि स्वप्नवत असा खास दिवस असतो. या दिवशी सर्वांची नजर सर्वात आधी पडते ती नवरीच्या स्पेशल लूकवर....साडी, दागिने, मेकअप आणि हेअर स्टाईल हे सगळं महत्त्वाचं असतंच, पण आजकालच्या नवरीला 'काहीतरी हटके' करायचं असतं. आणि त्या 'हटके' लूकसाठी सर्वात जास्त लक्ष वेधून घेणारी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे 'ब्लाऊजची बॅक डिझाईन'(Blouse Back Design For Saptapadi).

सप्तपदीसाठी नववधूचा खास साजश्रृंगार! पाहा ब्लाऊजचे १० डिझाइन्स - सांगतात दिल्याघेतल्या वचनांची गोष्ट...

लग्नातील प्रत्येक क्षण नवरीसाठी खास असतो, त्यातही सप्तपदीचा क्षण तर आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा आणि लक्षात राहणारा असतो. या खास वेळी नवरीचा लुक परफेक्ट दिसावा यासाठी साडीबरोबरच ब्लाऊज डिझाइनलाही तितकंच महत्त्व आहे. बरं, हे ब्लाऊज डिझाईन कसं असावं? तर ते नवरीच्या व्यक्तिमत्त्वाला आणि लग्नाच्या थीमशी जुळणारं असायला हवं....त्यातही, जर तुम्हाला तुमचा ब्लाऊज 'कस्टमाइज्ड' (Customized) करायचा असेल, तर त्याला काही मर्यादाच नाहीत( bridal blouse back designs for wedding).

सप्तपदीसाठी नववधूचा खास साजश्रृंगार! पाहा ब्लाऊजचे १० डिझाइन्स - सांगतात दिल्याघेतल्या वचनांची गोष्ट...

कस्टमाइज्ड ब्लाऊज म्हणजे केवळ नाव किंवा फोटो नव्हे, तर तुमच्या भावना, आठवणी आणि आवडीनिवडीनुसार हटके, भन्नाट आगळंवेगळं असं काहीतरी करता येत...लग्नात सप्तपदीच्या सात पावलांसाठी तयार होणाऱ्या 'नवरी'साठी, काही अत्यंत सुंदर आणि ट्रेंडी 'ब्लाऊज बॅकच्या डिझाइन्स पाहूयात...

सप्तपदीसाठी नववधूचा खास साजश्रृंगार! पाहा ब्लाऊजचे १० डिझाइन्स - सांगतात दिल्याघेतल्या वचनांची गोष्ट...

तुमचं आणि तुमच्या जोडीदाराचं नाव, लग्नाची तारीख किंवा लग्नाचा हॅशटॅग ब्लाऊजच्या बॅकवर कोरून, तुमच्या साध्या ब्लाऊजला एक आगळावेगळा 'स्टेटमेंट पीस' चा स्पेशल असा ट्रेंडी लूक देऊ शकता.

सप्तपदीसाठी नववधूचा खास साजश्रृंगार! पाहा ब्लाऊजचे १० डिझाइन्स - सांगतात दिल्याघेतल्या वचनांची गोष्ट...

सप्तपदीच्या सात पावलांचं महत्त्व सांगणारे श्लोक किंवा तुमच्या आवडत्या हिंदी किंवा मराठी गाण्याचे ओळी ब्लाउजवर कोरून, ब्लाऊजला एक क्लासी टच देऊ शकता.

सप्तपदीसाठी नववधूचा खास साजश्रृंगार! पाहा ब्लाऊजचे १० डिझाइन्स - सांगतात दिल्याघेतल्या वचनांची गोष्ट...

तुमची प्रेम कहाणी किंवा तुमच्या पहिल्या भेटीची आठवण असलेला एखादा फोटो बॅकवर कोरून, त्याला एकदम कस्टमाइज्ड करुन घेऊ शकता.

सप्तपदीसाठी नववधूचा खास साजश्रृंगार! पाहा ब्लाऊजचे १० डिझाइन्स - सांगतात दिल्याघेतल्या वचनांची गोष्ट...

तुमच्या जोडीदाराचा किंवा तुमच्या दोघांचा एखादा सर्वात जास्त आवडलेला कपल फोटो देखील तुम्ही तुमच्या ब्लाऊजच्या बॅकवर फोटो एम्ब्रॉयडरी करुन घेऊ शकता.

सप्तपदीसाठी नववधूचा खास साजश्रृंगार! पाहा ब्लाऊजचे १० डिझाइन्स - सांगतात दिल्याघेतल्या वचनांची गोष्ट...

आपल्या संस्कृतीची शान असणारे पारंपरिक दागिने म्हणजेच नथ, ठुशी, कोल्हापुरी साज किंवा इतर दागिन्यांची विशेष एम्ब्रॉयडरी करुन तुम्ही तुमच्या साध्या ब्लाऊजलाही एकदम हटके लूक देऊ शकता.

सप्तपदीसाठी नववधूचा खास साजश्रृंगार! पाहा ब्लाऊजचे १० डिझाइन्स - सांगतात दिल्याघेतल्या वचनांची गोष्ट...

ब्लाऊजच्या मागच्या भागात तुम्ही तुमच्या आवडीनुसार 'सुखी भव', शुभ लग्न' किंवा एखादा चांगला श्लोक किंवा वाक्य लिहून त्यावर जरतारी एम्ब्रॉयडरी केल्यास ब्लाऊज व साडी अगदी उठून दिसते.

सप्तपदीसाठी नववधूचा खास साजश्रृंगार! पाहा ब्लाऊजचे १० डिझाइन्स - सांगतात दिल्याघेतल्या वचनांची गोष्ट...

लग्नातील खास क्षणाचे चित्र म्हणजेच डोली, पालकी डिझाइन्सचे पॅच देखील तुम्ही ब्लाऊजच्या मागच्या भागात लावून साध्या ब्लाऊजला एकदम स्टायलीश तरी पारंपरिक लूक देऊ शकता.

सप्तपदीसाठी नववधूचा खास साजश्रृंगार! पाहा ब्लाऊजचे १० डिझाइन्स - सांगतात दिल्याघेतल्या वचनांची गोष्ट...

आजकाल मुली नवऱ्याचे नाव मेहेंदीमध्ये लिहिण्यासोबतच ते ब्लाऊजच्या डिझाइन्समध्ये देखील वेगवेगळ्या पद्धतीने लिहून एकदम भन्नाट लूक करतात. विशालची कारभारीण, शुभमची बायको, शैलेशची नवरी, राजेश की दुल्हनिया असं वेगवेगळ्या प्रकारे लिहून कस्टमाइज केल्यास ब्लाऊज आणखीनच सुंदर दिसतो.

सप्तपदीसाठी नववधूचा खास साजश्रृंगार! पाहा ब्लाऊजचे १० डिझाइन्स - सांगतात दिल्याघेतल्या वचनांची गोष्ट...

ब्लाऊजच्या मागे डोरी आणि टॅसल्स किंवा लटकन लावलेले डिझाइन असेल तर पारंपरिक आणि ट्रेंडी असे दोन्ही लुक देतात.

सप्तपदीसाठी नववधूचा खास साजश्रृंगार! पाहा ब्लाऊजचे १० डिझाइन्स - सांगतात दिल्याघेतल्या वचनांची गोष्ट...

आजकाल ब्लाऊजच्या बॅकला डोरी लावून त्यासोबतच आकर्षक असे झुमका देखील लावून सजवले जाते ज्यामुळे ब्लाऊज नेहमीपेक्षा अधिक सुंदर व आकर्षक दिसतो.