Makar Sankranti 2026 : पाहा काळ्या पैठणीचे १० सुंदर प्रकार, नजर हटणार नाही तुमच्यावर असं खुलून येईल रुप!
Updated:January 12, 2026 20:20 IST2026-01-12T20:20:00+5:302026-01-12T20:20:02+5:30
black paithani saree designs : Makar Sankranti special paithani saree : black paithani saree for Sankranti celebration : हळदी-कुंकवाचे कार्यक्रम, घरगुती पूजा किंवा खास संक्रांत समारंभांसाठी काळी पैठणी हा परफेक्ट पर्याय ठरतो...

मकरसंक्रांतीच्या सणाला गोडाधोडाचे पदार्थ खाण्यासोबतच, महिलांमध्ये विशेषतः काळ्या रंगाची साडी (black paithani saree designs) नेसून पारंपरिक वेशभूषा देखील केली जाते. पारंपरिक समजुतीनुसार संक्रांतीला काळे कपडे परिधान करणे शुभ मानले जाते आणि त्यातही जर ती 'पैठणी' असेल, तर आपल्या पूर्ण लुकला चार चाँद लागतात. पैठणी म्हणजे केवळ एक वस्त्र नाही, ती महाराष्ट्राची शान आणि मराठमोळ्या संस्कृतीचा (black paithani saree for Sankranti celebration) अविभाज्य भाग आहे. तिच्या रेशमी धाग्यांमधून विणलेले मोर, पोपट, कमळ आणि पारंपरिक नक्षीकाम तिला एक वेगळाच राजेशाही लुक देते.
आजकाल बाजारात पारंपरिक काळ्या पैठणीसोबतच आधुनिक डिझाईन्स आणि (Makar Sankranti special paithani saree) आकर्षक रंगांच्या काठापदर असलेल्या पैठण्या उपलब्ध आहेत. तुम्हालाही यंदाच्या संक्रांतीला एक खास काळी पैठणी नेसून सर्वांचे लक्ष वेधून घ्यायचे असेल तर, काही निवडक, लेटेस्ट आणि ट्रेंडिंग काळ्या पैठणीचे डिझाईन्स, जे तुमच्या संक्रांतीचा सण अधिक खास करतील...
काळ्या पैठणीवर सोनसळी किंवा रंगीबेरंगी जर, मोर, कमळ, अश्व किंवा पारंपरिक बुट्टे (black paithani design for Makar Sankranti festival) असलेले डिझाईन्स संक्रांतीच्या सणाला रॉयल लुक देतात. मोराच्या सुंदर नक्षीसह पैठणी ही नेहमीच ट्रेंडमध्ये असते आणि संक्रांतीला खास शोभून दिसते.
हळदी-कुंकवाचे कार्यक्रम, घरगुती पूजा किंवा खास संक्रांत समारंभांसाठी काळी पैठणी हा परफेक्ट पर्याय ठरतो.
काळ्या रंगाच्या मखमली पोतावर जेव्हा सोन्याचा जर आणि मोर-पोपटांची नक्षी उमटते, तेव्हा तो लूक केवळ पारंपरिक राहत नाही तर तो एक 'स्टाईल स्टेटमेंट' बनते.
काळ्या पैठणीवर सोनेरी किंवा मल्टीकलर मोरांची नक्षी असलेला पदर आणि काठ. हा क्लासिक लुक कधीही जुना होत नाही.
ज्यांना पैठणीचा रॉयल लुक अधिक ठळकपणे दाखवायचा असेल, त्यांच्यासाठी मोठ्या काठाची पैठणी उत्तम. काठावर विविध पक्षी, वेली किंवा कमळाचे डिझाईन्स असेल तर लूक अधिक उठावदार दिसतो.
काळ्या रंगावर लाल, हिरवा, गुलाबी किंवा जांभळ्या रंगाचा कॉन्ट्रास्ट पदर आणि काठ असलेली पैठणी अधिक उत्तम दिसते.
संपूर्ण पैठणीवर सोनेरी किंवा चांदीच्या धाग्याने विणलेल्या बारीक बुट्ट्या जसे की, पान, तारे, ठिपके असलेला प्रकार एलिगंट लुक देतो.
चमकदार सिल्क फिनिशमुळे ही पैठणी हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमात विशेष लक्ष वेधून घेते.
परंपरा जपत आधुनिक डिझाईन्सची सांगड घालणारी काळी पैठणी ही आजच्या काळात फॅशन आणि संस्कृतीचा सुंदर संगम ठरत आहे.