हिवाळा स्पेशल: ऑफिस- कॉलेजसाठी ५ फॅशनेबल श्रगचे पॅटर्न, डेली वेअरसाठी एकसेएक पर्याय, दिसाल स्टायलिश-कूल
Updated:December 15, 2025 09:30 IST2025-12-15T09:30:00+5:302025-12-15T09:30:02+5:30
winter shrug for women: office wear shrug: college wear shrug: श्रगचे काही नवीन पॅटर्न पाहूया.

हिवाळा सुरु झाला की आपल्या कपाटात जाड जॅकेट्स, स्वेटर्ससोबतच हलके-फुलके पण स्टायलिश असे श्रग्स हे महिलांचे आवडते फॅशन आयटम बनले आहेत. विशेषतः ऑफिस किंवा कॉलेजला जाणाऱ्या मुलींसाठी श्रग म्हणजे थंडीपासून संरक्षण आणि स्टाईलचा परफेक्ट मेळ. फार जड नाही ना, कुठल्याही आउटफिटवर सहज मॅच होणारा श्रग हा आजच्या फॅशनचा महत्त्वाचा भाग बनला आहे.(winter shrug for women)
जीन्स-टॉप, कुर्ती-लेगिंग, ड्रेस किंवा ट्युनिक कोणत्याही पेहरावावर श्रग सहज शोभून दिसतो. पाहूया श्रगचे काही नवीन पॅटर्न. (office wear shrug)
चंकी निट श्रग हा जाड लोकरीपासून बनवलेला असतो. जीन्स, टर्टलनेक आणि बूटसह छान दिसतो. तर क्रीम, बेज आणि राखाडी अशा मऊ रंगांमध्ये तो क्लासिक दिसतो.
लांब वॉटरफॉल श्रग हा वेस्टर्न ड्रेसेस, टॉप्स किंवा ऑफिस वेअरसह सुंदर दिसतो. हा श्रग फ्लीस किंवा सॉफ्ट वूल फॅब्रिकमध्ये सर्वोत्तम दिसतो.
पार्टी किंवा फंक्शनसाठी फॉक्स फर श्रग चांगला पर्याय आहे. साड्या, गाऊन किंवा पार्टी ड्रेसेसना रॉयल लूक देतो. यात काळा, पांढरा आणि पेस्टल रंग सर्वात लोकप्रिय आहेत.
हुड असलेला विणलेला श्रग स्टायलिश आणि उबदार. यामध्ये कान झाकले जातील अशी कान टोपी सुद्धा असते. कॅज्युअल जीन्स आणि टॉप्स, टी-शर्ट किंवा अॅथलीट लूकवर उठून दिसतो.
हाताने विणलेले किंवा क्रोशे केलेले डिझाइन हिवाळ्यात ट्रेंडी पर्याय आहे. मस्टर्ड, वाइन आणि नेव्ही सारख्या रंगांमध्ये छान दिसते.