Women's Watch Fashion: महिलांसाठी घड्याळाचे खास कलेक्शन! ५ ट्रेण्डी पर्याय, देतात रॉयल लूक- किंमतही अगदी खिशाला परवडणारी
Updated:August 17, 2025 18:26 IST2025-08-17T18:21:27+5:302025-08-17T18:26:36+5:30
Women’s watches: Trendy watches for women: Stylish ladies watches: तुमच्या वॉडरोबमध्ये या ५ ट्रेण्डी घड्याळ नक्की असायला हव्यात.

घड्याळ ही फक्त वेळ दाखवत नाही तर ती आपल्या व्यक्तिमत्त्वाची ओळख आणि स्टाईलही दर्शविते. महिलांसाठी ही एक खास ऍक्सेसरी आहे , जे त्यांच्या प्रत्येक लूकला अधिक आकर्षित बनवते. (Trendy watches for women)
जर आपण देखील ऑफिस किंवा कोणत्याही फंक्शनसाठी बाहेर जात असाल तर तुमच्या वॉडरोबमध्ये या ५ ट्रेण्डी घड्याळ नक्की असायला हव्यात. (Stylish ladies watches)
CASIO चं F91W वॉच हे घड्याळ सध्या तुफान व्हायरल आहे. हे मॉडल आपल्या लूकमध्ये अधिक भर घालत. याची किंमत ३ हजारांच्या आत आहे.
TIMEX MILITARY चं पिवळ्या रंगाचं ब्राईट आणि पॉपी वॉच. जर आपल्याला मोठ्या डायलची घड्याळं अधिक आवडत असतील तर हे आपण विकत घेऊ शकतो. हे आपल्याला साडेचार ते पाच हजारांच्या आत मिळेल.
DWC देवनागरी क्रोनोग्राफ. याम्ये आपल्याला मराठीमध्ये अंक पाहायला मिळतील. यामध्ये अबोली रंगाची गोल डायल आणि डार्क रंगाच्या बेल्टसह बाजारात उपलब्ध आहे. हे वॉच आपल्याला डिसेंट लूक देते. याची किंमत साडेचार ते पाच हजारांच्या आत आहे.
चौकोनी डायलचं VERTE URBN. हे घड्याळ दिसायला युनिक आणि कूल आहे. हे वॉटर रेझिस्टंट आणि शॉक रेझिस्टंट, मॅगनेटिंक आहे. याचे बेल्ट देखील आपल्याला चेंज करता येतात. याची किंमत ५ हजारांपर्यंत आहे.
TITAN RAGA चं ब्राऊन डायलचं ANALOGUE वॉच. हे घड्याळ मेटल स्ट्रॅपच आहे. या वॉचमुळे आपल्याला रॉयल लूक मिळेल. हे घड्याळ आपल्याला ५ ते ६ हजारांमध्ये मिळेल.