पोट सुटलंय- दंड जाड दिसतात? कुर्ती निवडताना 'या' टिप्स लक्षात ठेवा- दिसाल अधिक सुंदर-देखण्या
Updated:October 16, 2025 18:00 IST2025-10-16T18:00:00+5:302025-10-16T18:00:02+5:30
Kurti styling tips: How to look slim in kurti: Fashion tips for chubby women: चुकीची कुर्ती निवडल्यावर गडबड होते. ज्यामुळे आपला संपूर्ण लूक खराब होतो.

महिलांना शॉपिंग करायला अधिक प्रमाणात आवडतं. आवडीच मिळालं तर साईज परफेक्ट मिळत नाही. साईज परफेक्ट मिळाली तर आपल्या शरीरयष्टीला चांगल दिसत नाही. शरीरानुसार वेगवेगळे कपडे वापरणे महिलांना आवडते. (Kurti styling tips)
प्रत्येकाच्या शरीराची ठेवण वेगळी असते. रचना देखील वेगळीच. अनेक महिलांना रोज, ऑफिस किंवा कॉलेजमध्ये कुर्ती घालायला आवडते. आपण जर थोडे गुबगुबीत, पोटावर चरबी असेल तर चुकीची कुर्ती निवडल्यावर गडबड होते. ज्यामुळे आपला संपूर्ण लूक खराब होतो. अशावेळी कुर्ती कशी निवडायची पाहूया. (How to look slim in kurti)
जर आपण थोडे गुबगुबीत असू तर शरीराला चिकटणारे कुर्ते घालणे टाळा. जास्त फिट असलेले किंवा पोटाला चिकटलेली कुर्ती घालून नका. ज्यामुळे आपण जाड दिसू.
पोटाच्या जवळ फिट असणारी कुर्ती घालणे टाळायला हवे. बेल्ट अॅक्सेसरीज देखील टाळायला हवे. यामुळे सगळ्याचे लक्ष आपल्याकडे जाते.
जर आपण कुर्ती गुडघ्याच्यावर घालणार असू तर कॉन्ट्रास्टिंग बॉटम्स घालणं टाळायला हवं. यामुळे आपल्या पोटाचा भाग अधिक ठळक होईल. त्याऐवजी बॉटम्स, एकाच रंगाचे किंवा प्रिंट पॅटर्न घ्या.
मध्यम लांबीच्या कुर्ती, अर्थात कंबरेपेक्षा वरच्या बाजूला असलेल्या कुर्तींमध्ये गॅप असणारी कुर्ती घालणं टाळा. जॅकेट असणारी कुर्तीसुद्धा घालू नका. त्याऐवजी लांब श्रग घातले तर अधिक छान दिसाल.
आपण कायम मलमल किंवा चिकनकरीच्या कपड्याची कुर्ती निवडायला हवी. ज्यामुळे ती थोडी कमी टाइट असते. लूज असल्यामुळे कपडे अंगाला चिकटत नाही. यामुळे आपण बारीक दिसतो.