Rakshbandhan 2025 : रक्षाबंधनसाठी पाहा परफेक्ट कुर्ता सेट, ७ सुंदर पॅटर्न! खास फेस्टिव्ह लूक तुमच्यासाठी
Updated:August 3, 2025 19:15 IST2025-08-03T19:09:10+5:302025-08-03T19:15:56+5:30
Rakhi celebration look : Sibling festival fashion: कुर्ता सेटचे ७ खास डिझाइन्स, सुंदर-कम्फर्टेबल ड्रेस..

श्रावणातील महत्त्वाचा आणि सगळ्यांचा आवडता सण रक्षाबंधन. या सणात प्रत्येक स्त्रीला नटायला आणि खास कपडे परिधान करायला उत्सुक असतात. अशावेळी जर आपल्याला खास, सिंपल आणि युनिक ड्रेस हवे असतील तर हे ७ पर्याय पाहा. (Rakhi celebration look)
आपल्याला साधा सूट घालायचा असेल तर पॅन्टसोबत कॉलर नेकलाइनसह डिझाइनचा कुर्ता घालू शकतो. (Sibling festival fashion)
लहान फ्लॉवर कट हेमलाइन कुर्ता ज्यामध्ये एस्कोलोप कट लेस लावलेली असेल. यावर सलवार स्टाईल पायजमा त्याच्यासोबत सुंदर दिसेल.
आपली हाईट छोटी असेल तर आपण गुडघ्याच्या लांबीच्या पटियाला सलवार सैल फिटिंग अनारकली ड्रेस घालू शकतो. ज्यामुळे तुमच्या सौंदर्यात भर पडेल.
सध्या व्ही नेकलाइन आणि हाफ स्लीव्हजचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात आहे. यामध्ये अनारकली सूट अधिक छान दिसतो.
रफल्स, फ्रिल्स आणि भरपूर प्लेट्स असलेला कुर्ता सेट सध्या अधिक ट्रेंडमध्ये आहे. यावर त्याच रंगाची पलाझो अधिक शोभून दिसते.
स्लिट कुर्ता आणि त्यावर हेमलाइन डिझाइनचा पॅटन सध्या चर्चेत आहे. आपण यावर मोठ्या आकाराचे कानातले आणि गळ्यातलं घालून त्याला अधिक खास बनवू शकतो.
धोती स्टाईल पॅन्ट आणि शर्ट स्टाईल कुर्ता दिसायला सुंदर आणि छान आहे. छोट्या उंचीच्या मुलींवर असे कपडे अधिक शोभून दिसतात.