सतराशेसाठ चपलांचे जोड कशाला पाहा प्रत्येक ड्रेस - साडीवर मॅच होणाऱ्या ७ चपला, टेंशनच विसरा...
Updated:February 27, 2026 20:00 IST2026-02-27T20:00:00+5:302026-02-27T20:00:02+5:30
best footwear for ladies : footwear that goes with every outfit : ladies footwear for all outfits : वेगवेगळ्या चपलांवरचा भरमसाठ खर्च नको 'हे' ५ चपलांचे जोड कोणत्याही आऊटफिटसाठी आहेत बेस्ट...

ladies footwear for all outfits
स्त्रियांसाठी फॅशन म्हटलं की फक्त कपडेच नाही, तर त्यासोबत मॅचिंग (best footwear for ladies) फुटवेअर असणंही तितकंच महत्त्वाचं असतं. मग तो ऑफिसचा फॉर्मल ड्रेस असो, नेहमीचा साधा कुर्ता असो किंवा एखाद्या लग्नातील भरजरी साडी - योग्य चपलांचा जोड तुमच्या संपूर्ण लूकला एक वेगळाच हटके, अप्रतिम लूक देतो.
अनेकदा आपल्याला प्रश्न पडतो की, प्रत्येक आऊटफिटसाठी वेगळ्या (footwear that goes with every outfit) चपला विकत घ्यायच्या का? पण काही अष्टपैलू चपलांचे प्रकार असे असतात की, जे तुम्ही कोणत्याही आऊटफिटवर अगदी डोळे झाकून परफेक्ट पेअरिंग करु शकता.
प्रत्येकवेळी नवीन ड्रेससोबत नवीन चपला घ्याव्या लागतात, ही अनेक (ladies footwear for all outfits) महिलांची कायमची समस्या असते. एथनिक, वेस्टर्न, ऑफिसवेअर किंवा कॅज्युअल प्रत्येक आऊटफिटसाठी वेगवेगळे फुटवेअर घेणं थोडं खर्चिक तर असतंच, पण स्टायलिंग करणंही कठीण होतं. अशावेळी काही असे स्मार्ट आणि क्लासिक चपलांचे प्रकार निवडले, जे जवळपास प्रत्येक आऊटफिटवर सहज मॅच होतात, तर तुमचा लुकही स्टायलिश दिसतो आणि वॉर्डरोबही मिनिमल राहतो.
परफेक्ट रंग, साधा पण एलिगंट डिझाईन आणि कम्फर्ट लक्षात घेऊन निवडलेल्या चपला साडीपासून जीन्सपर्यंत कोणत्याही लुकला परफेक्ट फिनिश देऊ शकतात. त्यामुळे कोणते ५ प्रकारचे चपलांचे जोड प्रत्येक महिलांच्या कलेक्शनमध्ये असायलाच हवेत आणि जे जवळपास सर्व आऊटफिट्ससोबत मॅच होतात, ते पर्याय कोणते ते पाहूयात...
१. लो - हिल्स म्युलस :-
जर तुम्हाला स्टाईल आणि आराम एकाच वेळी हवा असेल, तर 'म्युलस' हा तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. हे फुटवेअर मागच्या बाजूने पूर्णपणे उघडे असतात आणि समोरून बंद असतात. लस तुम्ही फॉर्मल पँट, जीन्स, ऑफिस वेअर तसेच लांब ड्रेसेसवरही सहज घालू शकता. कमी उंचीच्या म्युलसमुळे पायाला जास्त ताण पडत नाही, त्यामुळे तुम्ही त्या दिवसभर ऑफिसमध्ये किंवा शॉपिंगला जाताना वापरू शकता. यात स्ट्रॅप्स किंवा बकल्स नसल्यामुळे या चपला घालणे आणि काढणे अत्यंत सोपे असते. ड किंवा पेस्टल रंगातील म्युलस कोणत्याही रंगाच्या कपड्यांवर उठून दिसतात आणि तुम्हाला एक आधुनिक लूक देतात.
२. लो बॅलेरिनाज :-
कधीही आऊटऑफ फॅशन न जाणारा आणि प्रत्येक स्त्रीच्या चपलांच्या कलेक्शनमध्ये असलेला सर्वात 'कम्फर्टेबल' प्रकार म्हणजे बॅलेरिनाज. या चपलांना टाच (Heel) नसते, त्यामुळे त्या पायांना अजिबात त्रास देत नाहीत. बॅलेरिनाज अशा आहेत ज्या तुम्ही ऑफिसच्या फॉर्मल कपड्यांवरही घालू शकता आणि जीन्स-टीशर्टसारख्या कॅज्युअल लूकवरही. जर तुम्हाला खूप वेळ चालायचे असेल किंवा प्रवासात राहायचे असेल, तर बॅलेरिनाज सर्वात जास्त आराम देतात. या चपला पायांना एक नाजूक आणि सुबक आकार देतात. विशेषतः अनारकली सूट किंवा शॉर्ट ड्रेसेसवर या अत्यंत आकर्षक दिसतात. यामध्ये तुम्हाला साध्या मॅट फिनिशपासून ते ग्लिटर किंवा बो (Bow) असलेल्या डिझाइन्सपर्यंत अनेक पर्याय मिळतात. ब्लॅक किंवा न्युड रंगाची 'बेली' कोणत्याही आऊटफिटवर मॅच होते. यात ब्राऊन, बेज, ब्लॅक कलर अधिक जास्त शोभून दिसतात.
३. फ्लॅट सँडल्स :-
जर तुम्हाला जास्त उंचीच्या चपला आवडत नसतील आणि तुम्हाला दिवसभर धावपळीचे काम असेल, तर 'फ्लॅट सँडल्स' हा तुमच्यासाठी सर्वात सुरक्षित आणि स्टाईलिश पर्याय आहे. हे प्रकार साधे असले तरी प्रत्येक आऊटफिटला एक वेगळा 'फ्रेश' लूक देतात. यामध्ये 'टी-स्ट्रॅप' (T-strap), 'ग्लेडिएटर' किंवा 'स्लिंगबॅक' असे अनेक उपप्रकार मिळतात. जे जीन्स, शॉर्ट्स, मॅक्सी ड्रेसेस आणि अगदी साडीवरही सुंदर दिसतात. साधे लेदर फ्लॅट्स जीन्सवर शोभतात, तर मणी किंवा खडे लावलेले (Embellished) फ्लॅट्स तुम्ही लग्नसमारंभात किंवा सणासुदीला ड्रेसवर घालू शकता.
४. स्नीकर्स :-
कॅज्युअल लूकसाठी व्हाईट स्नीकर्स खूप ट्रेंडमध्ये आहेत. केवळ जीन्सच नाही, तर लांब स्कर्ट्स आणि अगदी साध्या सुती साड्यांवरही हे स्नीकर्स खूप कूल दिसतात. एकेकाळी फक्त जिम किंवा खेळापुरते मर्यादित असलेले स्नीकर्स आता फॅशन विश्वातील सर्वात 'कूल' आणि 'ट्रेंडी' प्रकार बनले आहेत. आजकाल केवळ जीन्सवरच नाही, तर अगदी साडी आणि लांब ड्रेसेसवरही स्नीकर्स घालण्याची मोठी क्रेझ आहे. जर तुम्हाला दिवसभर धावपळ करायची असेल, तर स्नीकर्सपेक्षा उत्तम पर्याय दुसरा कोणताही नाही. 'क्लासिक व्हाईट स्नीकर्स' सध्या प्रचंड लोकप्रिय आहेत. ते कोणत्याही रंगाच्या फ्लोरल ड्रेस, शॉर्ट स्कर्ट किंवा डेनिमवर परफेक्ट मॅच होतात. पावसाळा असो वा हिवाळा, स्नीकर्स तुमचे पाय सुरक्षित ठेवतात आणि तुम्हाला एक मॉडर्न 'स्पोर्टी' लूक देतात.
५. क्लासिक लोफर्स (Classic Loafers) :-
जर तुम्हाला 'प्रोफेशनल' आणि 'रॉयल' लूक हवा असेल, तर क्लासिक लोफर्स हा तुमच्यासाठी सर्वात उत्तम पर्याय आहे. हे शूजसारखे पूर्ण बंद असतात पण त्यांना लेस नसते, त्यामुळे ते दिसायला अतिशय सुबक आणि घालायला सोपे असतात. लोफर्स हे विशेषतः फॉर्मल पँट, ब्लेझर किंवा शर्ट-पँटवर अतिशय उठावदार दिसतात. तुम्हाला मीटिंग किंवा ऑफिसमध्ये 'पॉवरफुल' लूक हवा असेल, तर लोफर्स नक्की ट्राय करा. आजकाल अनेक स्त्रिया कुर्ती आणि सिगारेट पँटवर किंवा लांब खादीच्या ड्रेसेसवर लोफर्स घालणे पसंत करतात. लोफर्स सहसा लेदर किंवा सुएड (Suede) मटेरियलमध्ये असतात, त्यामुळे ते बराच काळ टिकतात आणि पावसाळा सोडून इतर सर्व ऋतूंमध्ये वापरता येतात. लेसेस बांधण्याचे टेन्शन नसल्यामुळे तुम्ही ते झटकन घालू शकता. प्रवासात किंवा कामाच्या गडबडीत हे अत्यंत सोयीचे ठरतात.
६. कोल्हापुरी चपला (Kolhapuri Chappals ) :-
ट्रेडिशनल आऊटफिट्सवर कोल्हापुरी चपलां इतका उत्तम पर्याय दुसरा कोणताही नाही. जीन्स आणि कुर्ती, साडी किंवा पटियाला ड्रेसवर या चपला एक 'एथनिक' टच देतात. सोनेरी किंवा कॉपर रंगातील कोल्हापुरी चपला सगळ्या रंगांवर चालतात.
७. मोजडी किंवा जुती :-
भरतकाम केलेल्या मोजडी भारतीय आणि इंडो-वेस्टर्न कपड्यांवर खूप छान दिसतात. या दिसायला नाजूक असतात आणि दिवसभर वापरण्यासाठी अत्यंत आरामदायक असतात.
हे काही बेसिक फुटवेअर पर्याय वॉर्डरोबमध्ये असतील, तर “कपड्यांवर कोणत्या चपला घालायच्या?” हा प्रश्न कायमचा सुटू शकतो.