एक नंबर तुझी कंबर! पाहा कंबरपट्ट्याचे ५ सुंदर डिझाइन्स- नव्या नवरीपासून सासूबाईंपर्यंत सर्वांसाठी सुंदर दागिना
Updated:August 14, 2025 19:00 IST2025-08-14T17:57:28+5:302025-08-14T19:00:24+5:30
Kamarpatta Design : नाजूक कंबरपट्ट्याचे ५ खास डिझाइन्स! ओवसा भरताना नव्या नवरीसाठी चांदीचा सुंदर दागिना- सणसमारंभात प्रत्येकीकडे असायलाच हवा

कंबरपट्टा याला कमरपट्टा किंवा कमरबंद असं देखील म्हटलं जातं. हा भारतीय अलंकारातील महत्त्वाचा दागिना मानला जातो. विशिष्ट सणसमारंभात किंवा लग्नात याचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. गौरी-गणपतीच्या सणानिमित्त बाजारात विविध पद्धतीचे दागिने पाहायला मिळतात. अशातच नवीन नवरीला ओवसा भरताना कंबरपट्टा म्हणून चांदीचा हा लाखमोलाचा दागिना घालू शकते. (Bridal silver ornament)
हल्ली कंबरपट्ट्यामध्ये मोत्यांचे, कुंदन, फुलांचे, सोनेरी रंगाचे विविध प्रकाराचे डिझाइन्स पाहायला मिळतात. जर आपल्याला देखील चांदीचा कंबरपट्टा घालण्याची इच्छा असेल तर ५ सुंदर पॅटर्न बघाच. (kamarpatta design)
जर आपल्याला कमरेभोवती चांदीचा कंबरपट्टा नको हवा असेल तर आपण एकाच बाजूला छल्ला लावतो तसा घालता येईल. यामुळे आपला लूक अधिक आकर्षित दिसेल.
कमरेवर अँकेलट वेस्ट कंबरपट्टा खूप सुंदर दिसेल. ही डिझाइन्स कोणत्याही वयोगटातील महिलेवर शोभून दिसेल.
आपल्याकडे चाव्यांचा गुच्छ असेल आणि त्याप्रमाणे कंबरपट्टा शोधत असाल तर चांदीचा छल्ला चांगला राहिल. यामुळे आपल्याला चांगला लूकही मिळेल.
चांदीचा हा साधा कंबरपट्टा ज्याला छोटे घुंगरु लावले आहेत. ते आपल्या नाजूक कंबरेवर शोभून दिसेल.
आपल्या खास लूक हवा असेल तर अँटीक डिझाइन असलेला चांदीचा कंबरपट्टा घाला.