World Saree Day: प्रत्येकीकडे हव्याच ‘या’ ५ सुंदर साड्या, परंपरा आणि प्रेमाचं खास प्रतीक
Updated:December 23, 2024 16:32 IST2024-12-21T15:42:06+5:302024-12-23T16:32:00+5:30

कोणत्याही वयोगटातल्या महिलेचं सौंदर्य साडी नेसल्यावर अधिक खुलून येतं, यात वादच नाही. पण काही काही पारंपरिक साड्या अशा आहेत की त्यांचा गर्भश्रीमंतीपणा आपोआपच ती साडी नेसणारीच्या अंगाखांद्यावर, चेहऱ्यावर झळकू लागतो. या साड्या म्हणजे खऱ्या अर्थाने कोणत्याही कार्यक्रमाची, सणसमारंभाची शान आहेत. त्या साड्या नेमक्या कोणत्या ते पाहूया..
आपल्या कपाटात एक तरी रेशमी, भरजरी पैठणी असावी, अशी इच्छा प्रत्येक महाराष्ट्रीयन महिलेची असते. हल्ली महाराष्ट्रातल्या तरुण मुली लग्नासाठी बनारसी शालूऐवजी महाराष्ट्रीयन पैठणी नेसण्यास जास्त प्राधान्य देत आहेत.
कोणत्याही कार्यक्रमाची, सणसमारंभाची शान आहे बनारसी साडी. अजूनही बऱ्याच ठिकाणी नवरी बनारसी शालू नेसूनच लग्नासाठी उभी राहाते. आपल्याकडे एखादी तरी बनारसी असायलाच हवी..
कांजीवरम साडी ही मुळची तामिळनाडूची. दक्षिण भारतात कोणत्याही लग्नकार्यात, शुभप्रसंगी नेसण्यासाठी महिला कांंजीवरम साड्यांनाच पहिला मान देतात. कांजीवरम साडी ही भारतातल्या महागड्या साड्यांपैकी एक म्हणून ओळखली जाते.
नारायण पेठ हा देखील साडीचा एक अतिशय सुंदर आणि देखणा प्रकार. तिच्या मोठ्या मोठ्या बॉर्डर अगदी पाहताक्षणीच लक्षवेधून घेतात.
चंदेरी सिल्क साडी ही मध्य प्रदेशची ओळख. ३ प्रकारच्या फॅब्रिकपासून ही साडी तयार केली जाते. भारतातील उत्कृष्ट साड्यांपैकी एक म्हणून चंदेरी सिल्क साडी ओळखली जाते.