आता केसांत माळा कधीही न कोमेजणारी 'क्रोशा'ची फुले! सदाबहार फॅशन - पाहा गजरा, फुलांचे लेटेस्ट डिझाईन्स...

Updated:March 5, 2026 20:00 IST2026-03-05T20:00:00+5:302026-03-05T20:00:02+5:30

Artificial Crochet Flowers For Hair : Crochet Flower Gajra For Women : crochet hair accessories for women: handmade crochet flower gajra : 'क्रोशा'ची आर्टिफिशियल फुल - गजरे सध्या मोठ्या प्रमाणात ट्रेंडमध्ये आहेत...

आता केसांत माळा कधीही न कोमेजणारी 'क्रोशा'ची फुले! सदाबहार फॅशन - पाहा गजरा, फुलांचे लेटेस्ट डिझाईन्स...

सण-समारंभ असो किंवा एखादे पारंपरिक फंक्शन, केसांत गजरा माळल्याशिवाय स्त्रीचा साज पूर्ण होतच नाही...परंतु सध्या मात्र पारंपरिक फुलांच्या गजऱ्यांसोबतच क्रोशाने बनवलेले आर्टिफिशियल फुलांचे गजरेही मोठ्या प्रमाणात ट्रेंडमध्ये आले आहेत. हे गजरे दिसायला आकर्षक, हलके आणि दीर्घकाळ टिकणारे असल्यामुळे अनेक महिलांची पसंती बनत आहेत.

आता केसांत माळा कधीही न कोमेजणारी 'क्रोशा'ची फुले! सदाबहार फॅशन - पाहा गजरा, फुलांचे लेटेस्ट डिझाईन्स...

क्रोशाच्या धाग्यांपासून तयार केलेले हे गजरे वेगवेगळ्या रंगांमध्ये, डिझाईन्समध्ये (Crochet Flower Gajra For Women) आणि पॅटर्नमध्ये उपलब्ध असतात. पारंपरिक जाई-जुईच्या फुलांच्या डिझाईनपासून ते मॉडर्न फ्लॉवर पॅटर्नपर्यंत अनेक आकर्षक पर्याय यात पाहायला मिळतात.

आता केसांत माळा कधीही न कोमेजणारी 'क्रोशा'ची फुले! सदाबहार फॅशन - पाहा गजरा, फुलांचे लेटेस्ट डिझाईन्स...

साडी, लेहेंगा किंवा इंडो-वेस्टर्न आउटफिटसोबत हे गजरे केसांच्या स्टाईलला खास आणि एलिगंट लूक देतात.

आता केसांत माळा कधीही न कोमेजणारी 'क्रोशा'ची फुले! सदाबहार फॅशन - पाहा गजरा, फुलांचे लेटेस्ट डिझाईन्स...

धाग्यांच्या विणकामातून साकारलेली ही रंगीबेरंगी फुले केवळ दिसायलाच मोहक नसून ती वर्षानुवर्षे टिकतात. सध्या इन्स्टाग्राम आणि पिनट्रेस्टवर या क्रोशा ॲक्सेसरीजचा मोठा ट्रेंड पाहायला मिळत आहे. वेस्टर्न आऊटफिटवर एक सिंगल गुलाब असो किंवा नऊवारी साडीवरचा भरगच्च गजरा, क्रोशा फुले प्रत्येक लूकला एक वेगळीच 'रॉयल' टच देतात.

आता केसांत माळा कधीही न कोमेजणारी 'क्रोशा'ची फुले! सदाबहार फॅशन - पाहा गजरा, फुलांचे लेटेस्ट डिझाईन्स...

हुबेहूब खऱ्या मोगऱ्यासारखे दिसणारे पांढरे विणलेले मणी आणि मधूनच असलेली हिरवी पाने, असा सदाबहार पांढराशुभ्र मोगऱ्याचा गजरा कोणत्याही साडीवर उठून दिसतो.

आता केसांत माळा कधीही न कोमेजणारी 'क्रोशा'ची फुले! सदाबहार फॅशन - पाहा गजरा, फुलांचे लेटेस्ट डिझाईन्स...

अंबाड्याभोवती माळण्यासाठी विविध रंगांचे (गुलाबी, पिवळे, निळे) लहान-लहान क्रोशा फुले एकत्र गुंफलेला गजरा. इंडो-वेस्टर्न लूकसाठी बेस्ट!

आता केसांत माळा कधीही न कोमेजणारी 'क्रोशा'ची फुले! सदाबहार फॅशन - पाहा गजरा, फुलांचे लेटेस्ट डिझाईन्स...

जर तुम्ही लांब वेणी घालत असाल, तर वेणीच्या प्रत्येक वळणावर लावता येतील अशी छोटी नाजूक क्रोशाची फुले फारच सुंदर दिसतात.

आता केसांत माळा कधीही न कोमेजणारी 'क्रोशा'ची फुले! सदाबहार फॅशन - पाहा गजरा, फुलांचे लेटेस्ट डिझाईन्स...

सध्या लग्नसराईत ट्रेंडिंग असलेले 'पिच', 'मिंट ग्रीन' आणि 'लॅव्हेंडर' रंगाचे क्रोशा गजरे, ज्यात मधूनच पांढरे मोती विणलेले असतात ते तुमचा स्पेशल वेडिंग लूक अधिकच खुलवतात. क्रोशा फुलांसोबत मोत्यांचा वापर केलेला गजरा लग्नसमारंभात खूप एलिगंट दिसतो.

आता केसांत माळा कधीही न कोमेजणारी 'क्रोशा'ची फुले! सदाबहार फॅशन - पाहा गजरा, फुलांचे लेटेस्ट डिझाईन्स...

पांढऱ्या धाग्यांनी तयार केलेले जाई-जुईच्या फुलांसारखे क्रोशाचे गजरे पारंपरिक साडीवर खूप सुंदर दिसतात.

आता केसांत माळा कधीही न कोमेजणारी 'क्रोशा'ची फुले! सदाबहार फॅशन - पाहा गजरा, फुलांचे लेटेस्ट डिझाईन्स...

वेगवेगळ्या रंगांच्या छोट्या क्रोशा फुलांनी बनवलेला हा गजरा फेस्टिवल किंवा हळदी कार्यक्रमासाठी परफेक्ट मॅच ठरतो.

आता केसांत माळा कधीही न कोमेजणारी 'क्रोशा'ची फुले! सदाबहार फॅशन - पाहा गजरा, फुलांचे लेटेस्ट डिझाईन्स...

लहान-लहान क्रोशा फुलांची क्लिप किंवा छोटा गजरा बनवून बन किंवा हाफ हेअरस्टाईलवर लावता येतो. लहान मुलींसाठी किंवा कॉलेजला जाणाऱ्या मुलींसाठी लहान आकाराची क्रोशाची फुले (उदा. सनफ्लॉवर, डेझी किंवा छोटी गुलाब) साध्या क्लिप्सवर लावून एक क्युट लूक तयार करता येतो.

आता केसांत माळा कधीही न कोमेजणारी 'क्रोशा'ची फुले! सदाबहार फॅशन - पाहा गजरा, फुलांचे लेटेस्ट डिझाईन्स...

साडी किंवा ड्रेसच्या रंगाला कॉन्ट्रास्ट असलेले क्रोशा फुलांचे गजरे सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत.

आता केसांत माळा कधीही न कोमेजणारी 'क्रोशा'ची फुले! सदाबहार फॅशन - पाहा गजरा, फुलांचे लेटेस्ट डिझाईन्स...

रंगीबेरंगी धाग्यांपासून बनवलेले हे गजरे दिसायला आकर्षक, हलके आणि टिकाऊ असल्यामुळे सध्या महिलांमध्ये खूप ट्रेंडिंग झाले आहेत. इतकंच नाही तर हे गजरे दीर्घकाळ टिकतात आणि कोणत्याही सणासाठी पुन्हा-पुन्हा वापरता येतात.