लांब बाह्यांच्या ब्लाऊजचे ८ सुंदर प्रकार, हिवाळ्यातल्या लग्नसराईसाठी असं स्टायलिश ब्लाऊज आपल्याकडे हवंच...
Updated:December 4, 2025 09:40 IST2025-12-04T09:37:46+5:302025-12-04T09:40:02+5:30

लांब बाह्यांचे ब्लाऊज हिवाळ्यातल्या लग्नसराईमध्ये खूप ट्रेण्डिंग ठरतात. कारण हे ब्लाऊज दिसायला तर स्टायलिश असतातच, पण थंडीपासूनही संरक्षण करतात.
अशा प्रकारचे वेल्वेटचे कित्येक सुंदर ब्लाऊज रेडिमेड मिळतात.
स्टोनवर्क, मोतीवर्क, थ्रेडवर्क असणारे फुल स्लिव्ह्ज ब्लाऊज दिसायलाही खूप छान असतात.
नेहमीपेक्षा थोडा वेगळा लूक हवा असेल तर लांब बाह्यांचं एक तरी ब्लाऊज आपल्या कलेक्शनमध्ये हवंच.
अशा पद्धतीचं डिझाईनही तुम्ही लांब बाह्यांच्या ब्लाऊजवर घेऊ शकता. या बेल स्लिव्ह्ज ब्लाऊज म्हणतात.
लांब बाह्यांच्या ब्लाऊजमधला हा जान्हवी कपूरचा एक सुंदर लूक पाहा.
हिवाळ्यातल्या लग्नसराईसाठी असं एखादं तरी ब्लाऊज आपल्या कलेक्शनमध्ये असायलाच हवं..