केसांमध्ये गजरा माळण्याच्या ७ युनिक आयडिया, हेअरस्टाईल साधीच असली तरी दिसेल सगळ्यात भारी..
Updated:November 20, 2025 14:40 IST2025-11-20T14:34:10+5:302025-11-20T14:40:59+5:30

लग्नसराईचे दिवस म्हटलं की केसांमध्ये गजरा माळणं आलंच.. साधारणपणे अशा रुटीन पद्धतीने गजरा माळला जातो. पण अशा त्याच त्या पद्धतीने गजरा माळण्यापेक्षा या काही वेगळ्या स्टाईल पाहा..
यामुळे तुमची हेअरस्टाईल साधीच असली तरी गजऱ्यामुळे तिला खूप वेगळा लूक मिळेल आणि चारचौघीत तुम्ही उठून दिसाल..
अशा पद्धतीचे गजरे हल्ली फुलवाले तयार करून देतात किंवा तुम्ही ते आर्टिफिशियल फुलांचेही घेऊ शकता..
साधा बो बांधलेला असला तरी त्याला रबरबॅण्ड लावतो त्या ठिकाणी असे भरपूर गजरे लावा.. खूप छान लूक येईल.
ही एक हेअरस्टाईल पाहा. घागरा, लेहेंगा घालणार असाल तर ही हेअरस्टाईल छान दिसते. तसेच पारंपरिक साडीवरही ती शोभून दिसते.
हल्ली बन अशा पद्धतीने पुर्णपणे गजऱ्यांनी झाकून टाकण्याचीही फॅशन आहे. अशी हेअरस्टाईलही ट्राय करून पाहा.
अशा पद्धतीने दोन वेगवेगळ्या रंगाच्या फुलांच्या कॉम्बिनेशनमधला गजराही तुम्ही स्पेशली तयार करून घेऊ शकता किंवा दोन गजरे एकत्र जोडून ते ही माळू शकता.
गजरा माळण्याची ही थोडी ट्रेंडी आणि हटके स्टाईल पाहा.. तरुण मुलींना ही स्टाईल मस्त दिसेल.
बन घातलेला असेल तर त्यावर गजरा माळण्याची ही आणखी एक खास स्टाईल पाहा..