काठपदरी-जरतारीच्या ड्रेसचे ७ सुंदर प्रकार, ‘असा’ जरतारी ड्रेस पाहून सगळे विचारतील घेतला कुठून..

Updated:February 9, 2026 15:56 IST2026-02-09T15:45:04+5:302026-02-09T15:56:00+5:30

7 beautiful types of Kathpadari-Zartari dresses, you will look stunning , see beautiful patterns : एकदम मस्त ड्रेस पॅटर्न. काठाचे ड्रेस दिसतात सुंदर.

काठपदरी-जरतारीच्या ड्रेसचे ७ सुंदर प्रकार, ‘असा’ जरतारी ड्रेस पाहून सगळे विचारतील घेतला कुठून..

जरी काठाची साडी तर मिळतेच मात्र आता तसे ड्रेस पिसही मिळते. दिसायला फार सुंदर दिसणारे जरीचे ड्रेस लहानांपासून मोठे कोणीही वापरु शकते. ७ प्रकार पाहा आणि तसा लुक करा. दिसाल रॉयल आणि सुंदर.

काठपदरी-जरतारीच्या ड्रेसचे ७ सुंदर प्रकार, ‘असा’ जरतारी ड्रेस पाहून सगळे विचारतील घेतला कुठून..

लाँग अनारकली ड्रेसच्या खालच्या घेराला जरी काठ लावल्यास ड्रेसला राजेशाही लूक येतो. चालताना घेर खुलतो आणि जरी काठ उठून दिसतो. सण, लग्न समारंभासाठी हा पॅटर्न फार उठावदार वाटतो.

काठपदरी-जरतारीच्या ड्रेसचे ७ सुंदर प्रकार, ‘असा’ जरतारी ड्रेस पाहून सगळे विचारतील घेतला कुठून..

फ्रॉक पॅटर्नमध्ये खालच्या बाजूला रुंद घेर असल्यामुळे जरी काठ खूप छान बसतो. मुलींच्या ड्रेससाठी हा पॅटर्न विशेष लोकप्रिय असून जरी काठामुळे साधा फ्रॉकही सणासुदीचा दिसतो.

काठपदरी-जरतारीच्या ड्रेसचे ७ सुंदर प्रकार, ‘असा’ जरतारी ड्रेस पाहून सगळे विचारतील घेतला कुठून..

ए-लाईन ड्रेस सरळ आणि स्लीक असतो. त्याच्या खालच्या काठावर जर वापरल्यास ड्रेसला क्लासिक आणि एलिगंट लूक येतो. जड काठ न घेता मध्यम जाडीचा जरी काठ या पॅटर्नला जास्त शोभतो.

काठपदरी-जरतारीच्या ड्रेसचे ७ सुंदर प्रकार, ‘असा’ जरतारी ड्रेस पाहून सगळे विचारतील घेतला कुठून..

पॅनल कट ड्रेसमध्ये अनेक तुकडे जोडलेले असल्यामुळे घेर मोठा होतो. अशा ड्रेसच्या खालच्या बाजूला जरी काठ लावल्यास डिझाइन फार रिच दिसतं. नृत्याचे ड्रेस किंवा फंक्शन वेअर साठी हा पॅटर्न उत्तम.

काठपदरी-जरतारीच्या ड्रेसचे ७ सुंदर प्रकार, ‘असा’ जरतारी ड्रेस पाहून सगळे विचारतील घेतला कुठून..

पुढे लहान आणि मागे मोठा घेर असलेल्या हाय-लो ड्रेसमध्ये जरी काठ फार वेगळ्या पद्धतीने मात्र सुंदर दिसतो. मागच्या लांब घेरावर जर लावायची ड्रेसला फॅशनेबल टच मिळतो.

काठपदरी-जरतारीच्या ड्रेसचे ७ सुंदर प्रकार, ‘असा’ जरतारी ड्रेस पाहून सगळे विचारतील घेतला कुठून..

सरळ कुर्ती कटमध्ये खालच्या बाजूला जर लावायची. साधा पण सणासुदीला योग्य असा लूक मिळतो. ऑफिस पार्टी किंवा कार्यक्रमांसाठी हा पॅटर्न सोयीचा असतो.

काठपदरी-जरतारीच्या ड्रेसचे ७ सुंदर प्रकार, ‘असा’ जरतारी ड्रेस पाहून सगळे विचारतील घेतला कुठून..

चेस्टखाली कट असलेल्या एम्पायर वेस्ट ड्रेसमध्ये खालचा भाग फ्लोई असतो. या फ्लोई भागाच्या काठावर जर वापरल्यास ड्रेस ग्रेसफुल दिसतो, विशेषतः सिल्क किंवा कॉटन सिल्क कापड असावे.